गावात आलिशान घरे बांधण्यासाठी बनले ठग, कोट्यवधीची फसवणूक; दोघांना अटक
By मनीषा म्हात्रे | Updated: March 31, 2024 20:42 IST2024-03-31T20:39:45+5:302024-03-31T20:42:32+5:30
अंगडिया बनून मुंबईतील व्यावसायिकांची कोट्यवधींना फसवणूक

गावात आलिशान घरे बांधण्यासाठी बनले ठग, कोट्यवधीची फसवणूक; दोघांना अटक
मुंबई : राजस्थानमध्ये आलिशान घरे बांधण्यासाठी दोन चुलत भावंडानी थेट अंगडिया बनून मुंबईतील व्यापाऱ्यांना टार्गेट केल्याचे एल टी मार्ग पोलिसांच्या चौकशीतून समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी भगाराम सारस्वत (२४) आणि काळुराम भगीरथ शर्मा (२२) या भावंडाना बेड्या ठोकलया आहेत.
आरोपींनी एका कंपनीची एक कोटी रुपयांना फसवणूक केली आहे. कुरिअर सेवा देण्याच्या बहाण्याने त्यांनी मासे निर्यात करणारी कंपनी चालवणाऱ्या व्यावसायिकाची फसवणूक केली. त्यांचे अन्य दोन साथीदार अद्याप पसार आहेत. आरोपींनी व्हीके अश्रफ एंटरप्रायझेसला कुरिअर देण्यासाठी संपर्क साधला तेव्हा ही घटना उघडकीस आली. “आरोपींनी मासे निर्यात करणाऱ्या कंपनीला आश्वासन दिले होते की ते १ कोटी रुपयांचे कुरिअर सुरक्षितपणे त्या ठिकाणी पाठवतील. मात्र, त्यांना रक्कम हायती लागल्यानंतर ते पसार झाले. याप्रकरणी १ मार्च रोजी त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
याप्रकरणी पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला. ते कोलकाता येथे असल्याचे समजले. तसेच एक संशयित अहमदाबाद येथे असल्याचे समजताच पथकाने एक पथक अहमदाबादला रवाना झाले. अहमदाबादला १८ मारच रोजी काळुराम त्यांच्या हाती लागला. काळुरामच्या चौकशीतून भावंडांचा प्रताप उघडकीस आला. बिकानेरमधून सारस्वतला देखील अटक करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी बिकानेरच्या तेजसर गावात राहत होते. “दोघांनी त्यांच्या गावात घरे बांधण्याचे स्वप्न रंगवले होते. अन्य दोन आरोपी पसार असून त्यांचा शोध सुरु आहे. या टोळीने अशाप्रकारे अनेकांना गंडविल्याचा संशय असून पोलीस अधिक तपास करत आहे.