शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दोन पती, 5 मुलं, तरीही प्रियकरासोबत लिव्ह इनमध्ये होती महिला; 1000 रुपयांच्या नादात गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 12:54 IST

महिलेने प्रियकरासाठी घेतली होती वेगळी रूम...!

गाझियाबादमध्ये लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने केवळ एक हजरा रुपयांसाठी आपल्याच प्रेयसीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. संबंधित महिलेने या पूर्वी आपल्या दोन पतींना सोडले होते. तिला पाच मुलेही आहेत. यांपैकी दोन मुलींचे लग्न झाले आहे. महिलेच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तोंड दाबून हत्या करण्यात आल्याची पुष्टी झाली. यानंतर, पोलिसांनी आरोची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी सोमवारी आरोपी प्रियकराला अटक केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबादमधील वेव्ह सिटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दीनानाथपूर पूठी गावात लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने एक हजार रुपयांच्या नादात प्रेयसीची हत्या केली. आरोपीने 18 मेच्या रात्री एक वाजता महिलेची हत्या केल्यानंतर, आत्महत्येची कहाणी रचून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोस्ट मॉर्टम रिपोर्टमध्ये त्याची पोलखोल झाली.

महिलेने प्रियकरासाठी घेतली होती वेगळी रूम -पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेरठच्या नंगला गावात राहणारी 45 वर्षीय गुड्डी दीनानाथपूर पूठीमध्ये जितेंद्र यादव यांच्या घरात राहत होती. ती साबन तयार करणाऱ्या एका फॅक्ट्रीमध्ये काम करत होती. येथे तिची ओळख सिखैडा मुजफ्फरनगर येथील रहिवासी आनंद शर्मासोबत झाली. यानंतर ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. डिसेंबरपासून ती आनंद शर्मा सोबतच एका भाड्याच्या घरात लिव्ह इनमध्ये राहत होती. यापूर्वी तिने आपल्या दोन पतींना सोडले होते. तिला पहिल्या पतीपासून दोन मुली झाल्या आहेत. ज्यांचे लग्न झाले आहे. दुसऱ्या पतीपासून तिला तीन मुलं झाली आहेत. ती त्यांना स्वतःसोबतच ठेवत होती. तिने एक खोली मुलांसाठी आणि दुसरी खोली आपल्यासाठी आणि आपल्या प्रियकरासाठी ठेवली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुड्डी आणि आनंद शर्मा या दोघांनाही दारूचे व्यसन होते. 18 मे रोजी दारू पिल्यानंतर, गुड्डीने माहेरी जाण्यासाठी आनंदकडे पाच हजार रुपयांची मागणी केली. त्यावेळी आनंदकडे दोन हजार रुपयेच होते. त्याने एक हजार रुपये गुड्डीला दिले. मात्र उरलेले एक हजार रुपये देण्यासाठीही गुड्डी अडून बसली होती. यामुळे त्यांच्यात वाद झाला. वाद सुरू असतानाही दोघांनी दारू प्यायली आणि नॉनव्हेज खाल्ले होते.

तोंड दाबून मारले - यानंतर गुड्डीने दाराला गळफास घेऊन आत्महत्येचे नाटक केले. यामुळे आनंद संतापला आणि त्याने गुड्डीची तोंड दाबून हत्या केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट