शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

दोन कोटींचा गंडा घालणाऱ्या हिशेब तपासनीसाला अटक; शिवडी पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 23:00 IST

फसवणुकीतल्या रक्कमेतून बदलापूर येथे घर, पत्नीसाठी 24 तोळे सोनं खरेदी केले आहेत. हे घर आणि सोने त्याने गहाण ठेवून त्यावर ही पैसे उधारीवर घेतले आहे.

ठळक मुद्देशिवडी रेल्वे स्थानकानजीक एका खासगी कंपनीत पांड्या हा 2011 मध्ये अकाऊंटंट म्हणून नोकरीला राहिला होता. या कंपनीतील सर्व व्यवहार पांड्याच्या निदर्शनाखाली होत होते. तो स्वतःच्या कंपनीची सर्व खाती हाताळत असल्यामुळे पैशांचे गैरव्यवहार तो सोयीस्करपणे करत होता.  शिवडी पोलिसांनी पांड्याला अटक केली असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  

मुंबई - शिवडी परिसरातील एका खासगी कंपनीला २ कोटींचा गंडा घालणाऱ्या हिशेब तपासनीसाला पोलिसांनी जेरबंद केले आहे. दिनेश पांड्या (42) याने 2012 ते 2019 या काळात कंपनीच्या १ कोटी 98 लाख रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. या पैशातून त्याने घर, जमिनी, गाडी आणि पत्नीसाठी दागिने घेतल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.  शिवडी रेल्वे स्थानकानजीक एका खासगी कंपनीत पांड्या हा 2011 मध्ये अकाऊंटंट म्हणून नोकरीला राहिला होता. या कंपनीतील सर्व व्यवहार पांड्याच्या निदर्शनाखाली होत होते. या गोष्टीचा फायदा घेत पांड्याने व्यवहारातील पैसे ट्‌प्या टप्याने गैरव्यवहार करत स्वतःच्या खात्यावर वळवण्यास सुरूवात केली. सन 2012 आणि 2013 वर्षादरम्यान पांड्याने पहिल्यांदा टप्या टप्याने 10 लाख 85 हजार 530 रुपये स्वतःच्या खात्यावर वळवले. त्यानंतर 2013-2014 मध्ये 23 लाख 94 हजार, 2015-2016 मध्ये 37 लाख 95 हजार, 2016-2017 मध्ये 29 लाख 86 हजार आणि 2017- 2018 मध्ये 32 लाख टप्या टप्याने वळवले. तसेच 2018 - 2019 मध्ये पांड्याने 7 लाख 83 हजार खात्यावर वळवले होते. तो स्वतःच्या कंपनीची सर्व खाती हाताळत असल्यामुळे पैशांचे गैरव्यवहार तो सोयीस्करपणे करत होता.  दरम्यान, नोव्हेंबर 2018 मध्ये पांड्या काही कामानिमित्त सुट्टीवर गेला होता. मात्र, सुट्टीवर जाण्यापूर्वी त्याने 1 लाख रुपयांचा व्यवहार स्वतःच्या खात्यावर केले होते. सुट्टीवर गेल्यानंतर पांड्याचा सहकाऱ्याला हिशोबात तफावत आढळून आल्याने त्याने ही बाब कंपनीच्या मालकाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर हा प्रकार उघड झालायचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी कंपनीतर्फे हर्शद पोपट यांनी शिवडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना हर्षदने फसवणुकीतल्या रक्कमेतून बदलापूर येथे घर, पत्नीसाठी 24 तोळे सोनं खरेदी केले आहेत. हे घर आणि सोने त्याने गहाण ठेवून त्यावर ही पैसे उधारीवर घेतले आहे. तसेच काही रक्कम त्याने आपल्या पत्नीच्या खात्यावर ही वळवली आहे. तसेच फसवणूकीच्या पैशातून एक गाडी आणि इंदौर, अहमदनगर येथेही जागा घेतल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, शिवडी पोलिसांनी पांड्याला अटक केली असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसArrestअटक