शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

२ जिवलग मैत्रिणी बनल्या सख्ख्या वैरी; दारूच्या नशेत होत्याचे नव्हते झाले मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 11:59 IST

राणी आणि सपना भाड्याच्या घरात राहत होत्या. राणी गुडगाव येथे ब्यूटी पार्लरमध्ये काम करायची तर सपना पार्टीत वेटर अथवा डेकोरेटरचे काम करायची

नवी दिल्ली - राजधानीच्या सिव्हिल मजनू टीला परिसरात एका महिलेने दुसऱ्या महिलेची चाकू भोसकून हत्या केली आहे. किरकोळ कारणावरून ही हत्या झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. मृत महिलेची ओळख ३५ वर्षीय राणी म्हणून झाली आहे. मृत महिला आणि आरोपी या दोघींनी खूप दारू प्यायली होती. त्यावेळी दोघींमध्ये भांडण झाले आणि याच भांडणाचे रुपांतर हत्येत झाले असं सुरुवातीच्या पोलीस तपासात उघड झाले. 

मंगळवारी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह पाहिल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमला पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांच्या तपासानुसार, हत्येतील आरोपी महिला ३६ वर्षीय सपनाला अटक करण्यात आली आहे. सपनाच्या वडिलांचे अलीकडेच निधन झाले होते. त्यांच्याबद्दल राणीने काही विधान केले. त्यावरून संतापलेल्या सपनाने राणीला जीवे मारले. 

राणी आणि सपना भाड्याच्या घरात राहत होत्या. राणी गुडगाव येथे ब्यूटी पार्लरमध्ये काम करायची तर सपना पार्टीत वेटर अथवा डेकोरेटरचे काम करायची. सपना ही घटस्फोटीत महिला असून तिला छोटी मुलगी आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साडेसात वाजता पीसीआरला कॉल आला. मजनू टिला परिसरात एका घराच्या तिसऱ्या मजल्यावर महिलेचा मृतदेह पडल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले तिथे सपना भेटली तिने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेची ओळख राणी म्हणून सांगितली. तपासानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. 

तपासात आरोपी सपनाने पोलिसांसमोर हत्येची कबुली दिली. २९ मे रोजी रात्री सपना, राणी, नेहा आणि तेनजिंग आणि अन्य मित्र रात्री उशीरा पार्टीसाठी नेहाच्या घरी गेले होते. तिथे सपना आणि राणी यांच्यात काही कारणावरून वाद झाला. त्यानंतर राणी आणि सपना दोघी राहत असलेल्या भाड्याच्या घरी पोहचल्या. याठिकाणी दोघींना पुन्हा दारू प्यायली, पहाटे ४ वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू होता. दोघींमध्ये पुन्हा वाद सुरू झाला. तेव्हा राणीने सपनाच्या मृत वडिलांबाबत कमेंट केली. त्यातून सपनाला राग आला. तिने चाकू भोसकून राणीचा खून केला. घटनास्थळी पोलिसांना चाकूही सापडला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी