19 year old Woman Gang raped While Returning from Navratri Event in Uttar Pradesh | भय इथले संपत नाही! नवरात्रीच्या कार्यक्रमातून परतणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार

भय इथले संपत नाही! नवरात्रीच्या कार्यक्रमातून परतणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार

महोबा: उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये घडलेली सामूहिक बलात्काराची घटना ताजी आहे. हाथरसमध्ये घडलेल्या घटनेनं संपूर्ण देश हादरला. मात्र देशातल्या महिला अजूनही सुरक्षित नाहीत. महिलांसोबत होणारे अत्याचार वाढतच आहेत. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. उत्तर प्रदेशातल्या महोबा जिल्ह्यातल्या पनवाडी भागात एका १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.

१९ वर्षीय मुलगी नवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातून परतत असताना तिघांनी तिच्या बलात्कार केला. बुधवारी रात्री हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. दुर्गामातेची आरती करून परतणाऱ्या तरुणीचं अपहरण करण्यात आलं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

पानवाडी परिसरात बलात्काराची घटना झाल्याची तक्रार पोलिसांना मिळाली. त्यानंतर तातडीनं कारवाई तिन्ही आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक अरुण कुमार श्रीवास्तव यांनी दिली. 'आरोपी मुलीला तिच्या घरामागे असलेल्या निर्जन स्थळी घेऊन गेले. तिथे त्यांनी तिच्यावर अत्याचार केले. याबद्दलची तक्रार मिळताच त्याच रात्री आरोपींना अटक करण्यात आली. पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी सुरू आहे. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत,' असं श्रीवास्तव यांनी सांगितलं.

Read in English

Web Title: 19 year old Woman Gang raped While Returning from Navratri Event in Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.