नवी मुंबई : मद्यपान करून वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा धडाका सुरू आहे. त्यानुसार मागील आठ महिन्यांत ड्रंक अॅण्ड ड्राइव्हच्या १७१३ कारवाई करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून २६ लाख ५२ हजार ५०० रुपयांचा दंड उकळण्यात आला आहे.शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याचा प्रयत्न वाहतूक पोलिसांकडून होताना दिसत आहे. त्याकरिता बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केल्या जात आहेत. त्यामध्ये मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवरही अंकुश ठेवला जात आहे. मद्यपान करून वाहन चालवल्याने अपघात घडून वाहनचालकासह इतर पादचारी अथवा वाहनचालकांच्याही जीविताला धोका उद्भवू शकतो. त्यामुळे शहरातील महत्त्वाच्या मार्गांवर नाकाबंदी करून मद्यपी वाहनचालकांचा शोध घेऊन कारवाई केल्या जात आहेत. त्यानुसार चालू वर्षात मागील आठ महिन्यांत एक हजार ७१३ जणांवर ड्रंक अॅण्ड ड्राइव्हच्या कारवाई करण्यात आल्या आहेत. त्यापैकी सर्वाधिक ३५० कारवाई जानेवारी महिन्यात केल्या आहेत. त्यामध्ये नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मद्यपान करून वाहन चालवणाºयांचा मोठा समावेश आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात जमा झालेली दंडाची रक्कमही सर्वाधिक असून, ती आठ लाख ९०० रुपये इतकी आहे.
मद्यपी चालकांवर कारवाईचा धडाका, आठ महिन्यांत १७१३ जणांवर गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 02:03 IST