शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांचे ‘कल्याण’, १७ चोऱ्या; सर्वाधिक घटना पश्चिम भागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 01:17 IST

Crime News : कल्याणमध्ये मोबाइल चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला असून, महिनाभरात अशा १७ घटना घडल्या आहेत. त्यापैकी सर्वाधिक घटना या पश्चिमेत घडलेल्या आहेत.

कल्याण : धूम स्टाइलने मोटारसायकलवरून येऊन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लांबविण्याचे प्रकार चोरट्यांकडून घडत असताना आता चोरट्यांनी पादचाऱ्यांचे मोबाइल लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. कल्याणमध्ये मोबाइल चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला असून, महिनाभरात अशा १७ घटना घडल्या आहेत. त्यापैकी सर्वाधिक घटना या पश्चिमेत घडलेल्या आहेत.मोबाइल चोरीच्या घटना प्रामुख्याने बाजार, बसस्थानक तसेच गर्दीच्या ठिकाणी घडतात. परंतु, रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांचे मोबाइल हिसकावून चोरी करण्याचे प्रकार चोरट्यांकडून सुरू झाले आहेत. धूम स्टाइलने दुचाकीवरून येऊन मोबाइल लांबविण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या तक्रारीवरून दिसत आहे.अनलॉकमध्ये वाहनचोरीचे प्रमाण एकीकडे वाढले असताना ऑक्टोबरमध्ये मोबाइल चोरीच्या घटनाही सर्रास घडत आहेत. महिनाभरातील घटनांचा आढावा घेता कल्याण शहरात आतापर्यंत १७ घटना घडल्या आहेत. पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन घटना वगळता अन्य १४ घटना पश्चिमेतील खडकपाडा, महात्मा फुले चौक आणि बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहेत. यातील सर्वाधिक १२ घटना या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. महात्मा फुले चौक पोलिसांनी मोबाइल चोरट्यांच्या नुकत्याच मुसक्या आवळल्या आहेत. 

चाकूच्या धाकानेही लूटमारचाकूच्या धाकाने तसेच मोबाइलवर बोलत असताना मोबाइल हिसकावून चोरीचे प्रकार सुरू असल्याने पादचाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. एकीकडे सोनसाखळी चोरीच्या घटनांवर काहीसा अंकुश आणण्यात कल्याणच्या पोलिसांना यश आले असताना आता मोबाइल चोरांचाही बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkalyanकल्याण