शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

2660 बनावट कंपन्या तयार करून 15 हजार कोटींची GST द्वारे फसवणूक,  8 जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 23:27 IST

आरोपींकडून 12.60 लाख रुपये, 2660 बनावट जीएसटी फर्मची कागदपत्रे, 32 मोबाईल आणि तीन कार जप्त करण्यात आल्या आहेत.

नोएडा पोलिसांनी 2.5 हजारांहून अधिक बनावट कंपन्या तयार करून 15 हजार कोटींहून अधिक फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. आरोपींनी पाच वर्षांत बनावट कंपन्या तयार करून जीएसटी रिफंड आयटीसी (इनपुट टॅक्स क्रेडिट) मिळवून सरकारची हजारो कोटींची फसवणूक केली. या टोळीतील एका महिलेसह आठ जणांना कोतवाली सेक्टर-20 पोलिसांनी अटक केली आहे. तर तीन सीएसह सात आरोपी फरार आहेत. दरम्यान,  फसवणूक करणाऱ्यांकडे साडेसहा लाखांहून अधिक लोकांचे पॅनकार्ड, आधार कार्ड, वीज बिल आदींचा डेटा होता. आरोपींकडून 12.60 लाख रुपये, 2660 बनावट जीएसटी फर्मची कागदपत्रे, 32 मोबाईल आणि तीन कार जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलीस आयुक्त लक्ष्मी सिंह यांनी सांगितले की, कोतवाली सेक्टर-20 मध्ये बनावट पॅनकार्ड वापरून बनावट कंपनी तयार केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. टोळीचा म्होरक्या दीपक मुर्जानी, पत्नी विनिता, आकाश सैनी, विशाल, मोहम्मद यासीन शेख, राजीव (सीए), अतुल सेंगर आणि अश्वनी अशी दिल्लीतून अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर तीन सीएसह सात आरोपी फरार आहेत. या आरोपींनी दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी कार्यालये उघडली होती. फसवणूक करणारे आरोपी बनावट फर्म तयार करून जीएसटी क्रमांक मिळवायचे आणि बनावट बिले वापरून सरकारकडून जीएसटी रिफंड मिळवत होते.

पोलिस तपासात आतापर्यंत जवळपास 2660 बनावट कंपन्या उघड झाल्या आहेत. या कंपन्यांमध्ये चार ते पाच कोटींची बनावट बिले तयार करून जीएसटी रिफंड घेतला जात होता. या टोळीत पन्नासहून अधिक जणांचा सहभाग असल्याचे समोर आला आहे. तर यामध्ये 12 पेक्षा जास्त सीए सामील आहेत. पोलिस आणि जीएसटी अधिकाऱ्यांच्या प्राथमिक तपासात पाच वर्षांत 15 हजार कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी केंद्रीय जीएसटी, आयकर विभाग आणि इतर यंत्रणांना माहिती देण्यात आल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले. या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी नोएडा पोलिसांच्या पथकाने दिल्ली, पश्चिम बंगाल, चंदीगड येथे जाऊन चौकशी केली आणि अनेक राज्यांमध्ये छापे टाकले.

अशी करत होते फसवणूकही टोळी दोन प्रकारे फसवणूक करत होती. टोळीची पहिली टीम आधारकार्ड, पॅनकार्ड, वीजबिल आदी बनावट कागदपत्रांचा वापर करून बनावट कंपन्या तयार करत असे. त्यानंतर त्याचा जीएसटी क्रमांक घेतला जात होता. तर दुसरी टीम बनावट कंपन्यांच्या नावाने बनावट बिले बनवून जीएसटी रिफंड मिळवून सरकारची फसवणूक करत होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी