शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात बंदुकीचा धाक दाखवून दीड लाखाची रोकड लुटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 01:25 IST

ही धक्कादायक घटना शनिवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली.

सातारा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अजंठा चौकालगत असणाऱ्या एका साडी सेंटर दुकानात बंदुकीचा धाक दाखवून दोघांनी दीड लाखाची रोकड लुटल्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना शनिवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साताऱ्यातील अजंठा चौकामध्ये साडी सेंटर या नावाचे दुकान आहे. शनिवारी रात्री दुकान मालक नेहमीप्रमाणे दुकान बंद करून गल्ल्यातील रक्कम मोजत होते. त्याचवेळी दोन तरुण त्यांच्या दुकानात आले. बंदुकीचा धाक दाखवून दुकानदाराकडून दिवसभरात विक्रीतून आलेली दीड लाखाची रक्कम घेऊन लुटारूंनी पलायन केले.

या प्रकारानंतर संबंधित दुकानदाराने सातारा शहर पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर हे आपल्या कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर संबंधित चोरटे ओळखीचे आहेत का, याची चाचपणी केली. सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली असून, ही पथके सातारा शहरासह, कराड, कोरेगाव येथे रवाना सुद्धा झाली आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी दुकानाच्या आजूबाजूच्या  परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी संबंधित लुटारू साडी सेंटर दुकानासमोर घुटमळत असल्याचे दिसून आले. सातारा शहर पोलिस ठाण्यात या घटनेची रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRobberyचोरी