शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Crime : गुंतवणुकीवर नफा देण्याच्या नावाखाली १५ कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 07:03 IST

फोर्टमधील प्रकार; पोलिसांत गुन्हा दाखल

मुंबई : मुंबई, राजकोटसह विविध ठिकाणी सुरू असलेल्या विकास प्रकल्पात गुंतवणुकीवर  चांगला नफा देण्याच्या नावाखाली गुंतवणूकदारांची १५ कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार फोर्टमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी  माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालाडमधील  रहिवासी असलेल्या ६० वर्षीय तक्रारदार हे एका एज्युकेशन संस्थेच्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. २००९ मध्ये त्यांची गोविंदभाई यांच्यामार्फत एका खासगी कंपनीचे अध्यक्ष जसाणी यांच्याशी ओळख झाली. यावेळी गोविंदभाई यांनी जसाणी यांच्या कंपनीचा एक विकास प्रकल्प सुरू असून त्यामध्ये गुंतवणूक केल्यास वार्षिक १५ ते २१ टक्के व्याज मिळणार असल्याचे सांगताच त्यांनी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला.यामध्ये त्यांच्यासह त्यांच्या नातेवाईक आणि मित्र परिवाराने जसाणी यांची भेट घेऊन प्रकल्पाबाबत माहिती घेतली. त्यांनाही जास्तीच्या व्याजाचे आमिष दाखवल्याने तक्रारदार यांनी १ कोटी ८० लाख रुपये गुंतवले. तर, अन्य २८ गुंतवणूकदार यांनी ५ कोटी २९ लाख रुपये अशी २००९ ते २०१३ या काळात एकूण ७ कोटी ९ लाखांची गुंतवणूक केली. जसाणी याने गुंतवणुकीबाबत प्रॉमिसरी नोट दिल्या. सुरुवातीला व्याजाची रक्कमदेखील दिली. मात्र काही दिवसाने पैसे देणे बंद केले. तक्रारदार यांनी पैसे परत देण्यासाठी तगादा लावला. यावेळी धनादेश देऊन काही दिवस ढकलले. मात्र खात्यात पैसे नसल्याने हे धनादेश वठले नाहीत. अखेर गुंतवणूकदारांनी न्यायालयात धाव घेतली हाेती. 

न्यायालयात सुनावणीन्यायालयात सुनावणी सुरू झाल्यानंतर जसाणी याने गुंतवणूकदारांची भेट घेऊन रक्कम व्याजासह परत करण्याचे आश्वासन दिले. मुद्दल आणि व्याज असे मिळून १३ कोटी १८ लाख रुपये परत करण्याचे त्याने कायदेशीर कबूल केले. मात्र तरीही रक्कम न मिळाल्याने अखेर गुंतवणूकदारांनी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाणे गाठून एकूण १५ कोटींच्या आर्थिक फसवणुकीची तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलीस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी