शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! ८ वर्षात १४ वेळा गर्भपात, लिव्ह-इन पार्टनरच्या त्रासाला कंटाळून महिलेने दिला जीव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 12:45 IST

Suicide case : ही ३३ वर्षीय महिला गेल्या ८ वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहत होती. ८ वर्षांत महिलेला १४ वेळा गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आले. याला कंटाळून महिलेने ५ जुलै रोजी आत्महत्या केली.

राजधानी दिल्लीत एका महिलेने आपल्या लिव्ह इन पार्टनरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. लिव्ह इन पार्टनरवर महिलेचा १४ वेळा जबरदस्तीने गर्भपात केल्याचा आरोप आहे. आत्महत्येचे हे प्रकरण असून हे प्रकरण दक्षिण पूर्व दिल्लीतील जैतपूर भागातील आहे. ही ३३ वर्षीय महिला गेल्या ८ वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहत होती. ८ वर्षांत महिलेला १४ वेळा गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आले. याला कंटाळून महिलेने ५ जुलै रोजी आत्महत्या केली.सुरुवातीला पोलीस  याला आत्महत्या मानत होते. मात्र, त्यानंतर महिलेच्या कपड्यातून सुसाईड नोट सापडली. त्यानंतर आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि बलात्कार या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.पीडित महिला दिल्लीतील जैतपूर भागात राहते. महिलेचे लग्न झाले होते आणि तिला दोन मुलीही आहेत, मात्र ९ वर्षांपासून ती महिला पतीपासून वेगळी राहत होती. महिलेने तिच्या दोन मुलींना वसतिगृहात शिकण्यासाठी पाठवले होते आणि सध्या ती स्वतः लिव्ह-इनमध्ये राहत होती. 

या महिलेच्या आत्महत्येची माहिती पोलिसांना ५ जुलै रोजी मिळाली. महिलेने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानंतर तपासादरम्यान पोलिसांना महिलेच्या कपड्यांमधून एक सुसाइड नोट मिळाली. सुसाईड नोटमध्ये महिलेने गेल्या ८ वर्षातील शोकांतिका लिहिली होती. बिहारमधील मधेपुरा येथील एका व्यक्तीला आत्महत्येसाठी जबाबदार धरण्यात आले होते. आरोपी नोएडातील एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करतो.महिलेने लिहिले आहे की, गेल्या ८ वर्षांत ती १४ वेळा गरोदर राहिली. पण प्रत्येकवेळी तिला लिव्ह इन पार्टनरने गर्भपात करायला लावला गेला. महिलेने तिच्या सुसाईड नोटमध्ये आरोपीविरुद्ध पुरावे मोबाईलमध्ये ठेवत असल्याचे लिहिले आहे. पोलिसांनी मोबाईल सील केला असून तपासानंतर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात नसून त्याचा पोलीस शोध घेत आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAbortionगर्भपातdelhiदिल्लीBiharबिहार