शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
4
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
5
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
6
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
7
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
8
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
9
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
10
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
11
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
12
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
13
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
14
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
15
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
16
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
17
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
18
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
19
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
20
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
Daily Top 2Weekly Top 5

मागील चार वर्षात १३०० बालके परतली स्वगृही; ठाणे शहर  पोलिसांना यश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 20:34 IST

ठाणे : ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात स्थापन झाल्यापासून ठाणे चाईल्ड प्रोटेक्शन युनीटने मागील चार वर्षात तब्बल १ हजार २८४ हरवलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना सुखरुपपणे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. तसेच विशेष योजनेंतर्गत राबवलेल्या पाचव्या ‘आॅपरेशन मुस्कान ’ अंतर्गत एकूण ६३७ बालकांना स्वगृही पाठवून त्यांच्या पालकांवरील हरवलेली ‘मुस्कान’ पुन्हा परत ...

ठळक मुद्देआॅपरेशन मुस्कानद्वारे ६३७ बालकांच्या पालकांच्या चेह-या मुस्कान ठाणे चाईल्ड प्रोटेक्शन युनीटची कामगिरी

ठाणे : ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात स्थापन झाल्यापासून ठाणे चाईल्ड प्रोटेक्शन युनीटने मागील चार वर्षात तब्बल १ हजार २८४ हरवलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना सुखरुपपणे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. तसेच विशेष योजनेंतर्गत राबवलेल्या पाचव्या ‘आॅपरेशन मुस्कान’ अंतर्गत एकूण ६३७ बालकांना स्वगृही पाठवून त्यांच्या पालकांवरील हरवलेली ‘मुस्कान’ पुन्हा परत आणली आहे.हरवलेले आणि पळवून नेलेल्या मुलांच्या शोधण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या घरापर्यंत सुखरुप पोहचविण्यासाठी १७ जुलै २०१४ मध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात चाईल्ड प्रोटेक्शन युनीटची स्थापना करण्यात आली. याचदरम्यान, २०१४ ते २०१६ या वर्षात १,०३६ तर २०१७ मध्ये २४८ अशी एकूण १,२८४ बालकांना ठाणे शहर पोलिसांनी युनीटने शोधून त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. तसेच २०१७ मध्ये ५ भिक्षेक-यांवर कारवाई करून त्यांची रवानगी चेंबूर येथे शासकीय भिक्षेकरी स्वीकार केंद्रात केली आहे. तसेच शासनाच्या आदेशानुसार राबविलेल्या विशेष पाचव्या ‘आॅपरेशन मुस्कान’ यामध्ये एकूण ६३७ बालकांचा शोध घेऊन त्यांना स्वगृही धाडण्यात यश आले. दरम्यान,त्या बालकांसह त्यांच्या आई-वडिलांचे या युनीटद्वारे समुपदेशन करण्यात आले आहे. तर, स्वगृह परतलेल्या बालकांमध्ये मुलीचे प्रमाण अधिक असून बहुतेक बालके ही परराज्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कामगिरी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली,पोलीस सहआयुक्त मधुकर पाण्डये, अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे,पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे, सहायक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले व ठाणे शहर चाईल्ड प्रोटेक्शन युनीटचे अधिकारी व कर्मचा-यांनी केली.

 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCrimeगुन्हा