शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

१३ वर्षीय पीडितेचे लैंगिक शोषण; गर्भवती झाल्यानंतर ८० हजार रुपयांत गर्भपाताचा सौदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 09:22 IST

विदर्भातील पहिलीच घटना

- चैतन्य जोशीवर्धा : राज्यभर गाजलेल्या परळी येथील स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणानंतर आर्वी येथेही अल्पवयीन पीडितेच्या गर्भपातानंतर पोलीस तपासामध्ये रुग्णालय परिसरातून मानवी कवट्या आणि हाडे सापडल्याने या रुग्णालयात भ्रूणहत्येचा काळाबाजारच सुरू असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

बीड जिल्ह्यातील परळीनंतर विदर्भात ही अशी पहिलीच घटना घडल्याने डॉक्टरी पेशाला काळिमा फासण्याचा प्रकार घडला आहे.या घटनेने राज्यभर खळबळ निर्माण झाली असून, अधिक तपासाकडे लक्ष लागले आहे. परळी येथे डॉ. सुदाम मुंडे, त्याची पत्नी सरस्वती मुंडे आणि पीडितेचा पती महादेव पेटकर यांनी स्त्रीभ्रूणहत्येचा कारखानाच उघडला होता. डॉक्टर दाम्पत्याने गर्भपात केलेल्या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर हे प्रकरण संपूर्ण राज्यात गाजले.

परळी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा तसेच अवैध गर्भलिंगनिदान चाचणी कायद्यान्वये गुन्हा दाखल होता. पोलिसांनी तपास केला असता डॉक्टर दाम्पत्याने अनेक गर्भपात करुन तीन अर्भके प्लास्टिकच्या पिशवीत भरून त्याच्या शेतातील पडक्या विहिरीत टाकल्याची धक्कादायक बाब पुढे आली होती. अशाच प्रकारची घटना आता वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे उघडकीस आली आहे. पोलीस कोठडीदरम्यान रुग्णालय परिसरामागे अनेक भ्रूण अवशेष पुरल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी रुग्णालय परिसराच्या मागे खोदकाम सुरु केले. अखेर बायोगॅसच्या चेंबरमध्ये ११ मानवी कवट्या आणि ५४ हाडे आढळून आली.

असे उलगडत गेले रहस्य

अवघ्या १३ वर्षीय पीडितेचे लैंगिक शोषण करून तिला गर्भवती बनविले. ही बाब घरच्यांच्या लक्षात येताच ते अल्पवयीन मुलाच्या घरी त्याच्या आई-वडिलांना समजावण्यासाठी गेले. ते पोलिसात जाण्याच्या बेतात असतानाच मुलाच्या आई-वडिलांनी त्यांना अडवून आम्ही पैसे लावतो, पीडितेचा गर्भपात करू, पोलिसात जाऊ नका. पोलिसात गेलात तर तुमच्या मुलीचीच बदनामी होईल, अशी भीती दाखवली. पीडितेच्या घरच्यांनी बदनामीखातर त्यांचे ऐकले. ८० हजार रुपयांत गर्भपाताचा सौदा झाला. डॉ. रेखा कदम हिने आधी ३० हजार घेतले आणि उर्वरित रक्कम नंतर देण्यास सांगितले. मात्र, पीडितेच्या घरच्यांनी याची शनिवारी रात्रीच पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी रविवारी सकाळी डॉ. रेखा कदमसह मुलाच्या आई व वडिलांना अटक केली.

टॅग्स :PoliceपोलिसDeathमृत्यू