13-year-old child committed suicide by jumping from the terrace of the building | धक्कादायक! वडाळ्यात इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून १३ वर्षीय मुलाची आत्महत्या 
धक्कादायक! वडाळ्यात इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून १३ वर्षीय मुलाची आत्महत्या 

ठळक मुद्देआज दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.१३ वर्षीय मुलाचा मृतदेह सायन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असून तपास पुढे सुरु असल्याची माहिती सांगळे यांनी दिली. 

मुंबई - वडाळ्यातील आयमॅक्स थिएटरनजीक असलेल्या गिरनार हाईट्स या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून १३ वर्षीय मुलाने आत्महत्या केली आहे. वडाळ्यातील या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. आज दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात या घटनेबाबत माहिती कळताच पोलीस घटनास्थळी पोचले आणि जागीच जीव गेलेल्या १३ वर्षीय मुलाचा मृतदेह सायन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. 

वडाळा टी. टी. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सांगळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, वडाळ्यातील आयमॅक्स थिएटरनजीक असलेल्या गिरनार हाईट्स या १८ माजली इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या करण्यात आली आहे. मुलगा अल्पवयीन असून मृतदेह सायन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. घटनास्थळी सुसाईट नोट सापडली नसून पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुलाची आई नॅशनल स्टॉक डिपॉझटरी लि. या कंपनीत तर वडील वोडाफोनमध्ये नोकरी करतात. आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असून तपास पुढे सुरु असल्याची माहिती सांगळे यांनी दिली.  


Web Title: 13-year-old child committed suicide by jumping from the terrace of the building
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.