शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

१३ वर्षाच्या मुलाने ३५ वर्षीय महिलेवर केला बलात्कार; कुत्र्यामुळे संशयित पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 21:21 IST

Rape Case : कुत्रा चावल्यामुळे आरोपीच्या हाताला झालेली दुखापत पाहता पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले आहे.

लंडन : ब्रिटनमध्ये एका 35 वर्षीय महिलेवर 13 वर्षीय मुलाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना लंडनमधील एका उद्यानातील असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाचा वाढता वाद पाहता पोलिसांनी कारवाई केली आणि 13 वर्षीय मुलाला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. महिलेवर बलात्कार करणारा दुसरा आरोपी अद्याप फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.१३ वर्षांच्या मुलावर बलात्काराचा आरोपमाय लंडन न्यूजच्या वृत्तानुसार, महिलेवर झालेल्या बलात्काराच्या घटनेतील १३ वर्षीय मुलाला कुत्र्यामुळे ताब्यात घेण्यात आले आली आहे. या प्रकरणी महिलेने दाखल केलेल्या तक्रार पत्रात असे लिहिले आहे की, लंडनमधील प्लमस्टेड येथील विन्स कॉमन येथे मंगळवारी रात्री 11 वाजता दोन संशयितांनी महिलेवर बलात्कार केला. त्यावेळी तेथे कुत्र्याला फिरवत असलेल्या एका व्यक्तीने एका आरोपीला पकडले. पकडलेला माणूस हा १३ वर्षांचा मुलगा आहे. दोघांमध्ये हाणामारी होत असताना कुत्र्याने आरोपी मुलाच्या हाताच्या बोटाचा चावा घेतला. महिलेवर बलात्कार करणारा दुसरा आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता.कुत्र्याने आरोपीला चावा घेतलालंडन पोलिसांनी बलात्काराच्या संशयावरून आरोपी अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. कुत्रा चावल्यामुळे आरोपीच्या हाताला झालेली दुखापत पाहता पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, 21 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या आधी या महिलेसोबत बलात्कार झाल्याची बातमी आली होती. माहिती मिळताच पोलीस लेकेडेल रोड, SE18 येथे पोहोचले.पोलीस दुसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेतपोलिसांनी सांगितले की, लेकेडेल रोड एसई 18 जवळील झुडपात दोन आरोपींनी 35 वर्षीय महिलेसोबत बलात्कार केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे. घटनास्थळी कुत्र्याला फिरवत असलेल्या एका व्यक्तीने संशयिताला पकडण्यात पोलिसांना मदत केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसऱ्या आरोपीलाही लवकरच अटक करण्यात येईल.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसLondonलंडनArrestअटक