शहरं
Join us  
Trending Stories
1
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
2
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
3
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
4
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
5
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
6
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
7
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
8
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
9
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...
10
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
11
Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले
12
२२ सप्टेंबरपासून स्वस्त होणार LPG सिलेंडर? GST कपातीनंतर ग्राहकांना मिळणार दिलासा, समोर येतेय अशी माहिती
13
काजोलने पुन्हा मोडली 'नो-किसिंग पॉलिसी', 'द ट्रायल २'मध्ये ऑनस्क्रीन पतीला केलं किस, व्हिडीओ व्हायरल
14
बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी
15
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
16
वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर उतरला.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच समोर आला भन्नाट VIDEO
17
तीन सरकारी बस एकमेकांवर धडकल्या, ४० हून अधिक प्रवासी जखमी, अनेकांची प्रकृती चिंताजनक  
18
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
19
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
20
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण

१२ वर्ष घरकाम करणाऱ्या मोलकरणीने लावला लाखोंचा चुना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 20:13 IST

चोरीच्या रक्कमेचा विचार करुनच त्यांना धक्का बसला. अखेर ममता यांनी नवघर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलीसांनी गुन्हा दाखल करुन सहाय्यकअधिक्षक अतुल कुलकर्णी व वरिष्ठ निरीक्षक राम भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक टिकाराम थाटकर, उपनिरीक्षक महेश कुचेकर व महिला पोलीस सुरेखा कुसाळकर यांनी तपास सुरु केला.

मीरारोड - १२ वर्ष घरकाम करता करता मालकिणीच्या घरातून  पैसे, चांदिच्या वस्तु आदी तब्बल २० लाख रुपयांची चोरी घरकाम करणाऱ्या महिलेने केली. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नवघर पोलीसांनी हा गुन्हा उघडकीस आणला आहे. घरकाम करणारी अपर्णा पवार (वय - ४६) या महिलेला अटक केली आहे.  एकाच ठिकाणी काम करणाऱ्या व सतराशे रुपये पगार मिळणाऱ्या आरोपी महिलेकडून दागदागिने, रोख रक्कम, एफडी मिळून तब्बल २० लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.

भार्इंदर पूर्व येथील नवघर मार्गावरील भाईदया ही जुनी इमारत आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ममता विष्णु चांगोलीवाला या राहतात. त्या गृहिणी असून त्यांच्या पतीचा कपड्यांचा व्यवसाय आहे. तर मुलगी कॉल सेंटरमध्ये काम करते. त्यांना एका सदनिकेचे भाडे सुद्धा त्यांना मिळते. आलेले पैसे वा खरेदी केलेली चांदी हे कपाटात ठेवताना त्याची नेमकी किंमत वा संख्या नोंद करुन ठेवत नसत. चांगोलीवाला यांच्या घरी गेल्या १२ वर्षांपासून त्याच इमारतीत चौथ्या मजल्यावर राहणारी अपर्णा भरत पवार ही घरकाम करत होती. शेजारीच राहणारी आणि इतक्या वर्षांपासून काम करणाऱ्या अपर्णाने देखील चांगोलीवाला कुटुंबियांचा विश्वास संपादन केला होता. दरम्यान, त्यांच्या घरातुन रोख रक्कम व चांदीची बिस्कीटे चोरीला जात होती. पण त्याचा रेकॉर्ड ठेवत नसल्याने त्यांना ते लक्षात येत नव्हतं. चोरीचा वाढता प्रकार पाहून व एकुणच त्यांनी अंदाजे हिशोब लावला असता तब्बल २० लाख रुपयांची चांदी व रोकड चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

चोरीच्या रक्कमेचा विचार करुनच त्यांना धक्का बसला. अखेर ममता यांनी नवघर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलीसांनी गुन्हा दाखल करुन सहाय्यकअधिक्षक अतुल कुलकर्णी व वरिष्ठ निरीक्षक राम भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक टिकाराम थाटकर, उपनिरीक्षक महेश कुचेकर व महिला पोलीस सुरेखा कुसाळकर यांनी तपास सुरु केला. चांगोलीवाला कुटुंबियांना घरकाम करणारया अपर्णावर जराही संशय नव्हता. परंतु पोलीसांनी अपर्णाची माहिती घेण्यास सुरवात केली. वन रुम किचनच्या खोलीत अपर्णा, तिचा पती व मुलगी तसेच दिराचे कुटुंब राहते. तिचा पती मद्यपी असून कामधंदा करत नाही. तर अपर्ण सुध्दा फक्त चांगोलीवाला यांच्याच घरी काम करते. तरी तिची घर चालवताना चणचण होत नसल्याचे व तिच्या एकूणच राहणीमानावरुन दिसत नसल्याचे पोलीसांनी हेरले. तिला ताब्यात घेऊन तिच्या घराची झडती घेतली असता तब्बल ३ लाख ४७ हजार ७०० रुपयांची रोकड व नव्याने केलेले सुमारे ६ लाख किमतीचे २२ तोळे सोने सापडले. शिवाय बँकेत ५ लाख ३३ हजार रुपये तर फिक्स डिपॉझीटमध्ये ठेवलेले ६ लाख रुपये आढळून आले. अपर्णाकडे मिळालेले हे घबाड पाहून चांगोलीवाला कुटुंब व पोलीस सुध्दा थक्क झाले. गुरुवारी अपर्णाला अटक केली असून ४ सप्टेंबरपर्यंत तिला पोलीस कोठडी मिळाली आहे. गेल्या ४ - ५ वर्षांपासून आपण रोख व चांदी चोरत होतो. त्या पैशातूनच सोन्याचे दागिने बनवल्याची कबुली तिने पोलिसांना दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyदरोडाmira roadमीरा रोड