शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सैन्य दलातील जवानास मारहाण करणाऱ्या बारच्या व्यवस्थापकासह ११ वेटरना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 21:02 IST

जवानास मारहाण करुन लष्कराबद्दल अपशब्द काढणाऱ्या मुजोर बार कर्मचाऱ्यांना अटक करा म्हणून मंगळवारी रात्री उशीरापर्यंत शिवसेना, मनसे व मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात ठाण मांडली होती.

ठळक मुद्दे जवानासह त्याच्या दोन मित्रांना जबर मारहाणप्रकरणी मीरारोड पोलीसांनी बारच्या व्यवस्थापकासह ११ वेटरना अटक केली आहे. पोलीस आणि संदेशचा भाऊ आल्याने तिघांची सुटका झाली.

मीरारोड - मीरारोडच्या कनकिया येथील पार्क व्हयु बारमध्ये मित्राला सोडवण्यास गेलेल्या सैन्यदलातील जवानासह त्याच्या दोन मित्रांना जबर मारहाणप्रकरणी मीरारोड पोलीसांनी बारच्या व्यवस्थापकासह ११ वेटरना अटक केली आहे. मात्र, बारचे सीसीटीव्ही फुटेज मात्र अजून मिळालेले नाही. तर जवानास मारहाण करुन लष्कराबद्दल अपशब्द काढणाऱ्या मुजोर बार कर्मचाऱ्यांना अटक करा म्हणून मंगळवारी रात्री उशीरापर्यंत शिवसेना, मनसे व मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात ठाण मांडली होती.बीलासोबतच अतिरीक्त ३०० रुपये लावल्याने त्याबद्दल बार व्यवस्थापकाकडे विचारणा करणाऱ्या संदेश पार्टे यास मारले म्हणून प्रशांत वाघमारे हे जवान वाद मिटवण्यामध्ये पडले. त्यावर बार कर्मचाऱ्यांनी पार्टेसह जवान वाघमारे व अन्य एक मित्र आनंद काळे यांना बेदम मारहाण केली. पोलीस आणि संदेशचा भाऊ आल्याने तिघांची सुटका झाली.या प्रकरणी पोलिसांनी फिर्यादीवरुन ३० ते ३५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. तर व्यवस्थापकासह अन्य ११ वेटर मिळून १२ जणांना अटक केली. जवानास मारहाण करुन लष्कराबद्दल अपशब्द काढल्याचे कळताच मराठी एकीकरण समिती, मनसे, शिवसेनेच्या पदाधिकारी - कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री पर्यंत पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. आरोपींना अटक करा अशी मागणी सर्वांनी लाऊन धरली होती. १२ आरोपींना अटक केल्याचे व अन्य आरोपींची पडताळणी करुन अटक करणार असल्याचे आश्वासन पोलिसांनी दिले. परंतु बारमधील सीसीटीव्हीचे फुटेज मात्र अजुनही पोलिसांच्या हाती लागले नसल्याने ते डिलीट केले जाण्याची भिती व्यक्त होत आहे. 

टॅग्स :ArrestअटकSoldierसैनिकPoliceपोलिस