शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
2
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
3
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
4
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
5
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
6
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
7
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
8
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
9
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
10
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
11
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
12
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
13
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
14
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
15
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
16
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
17
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
18
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
19
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
20
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी

फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून 12 लाख रुपये लुटले, बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात होता कर्मचारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 14:41 IST

12 Lakh Loot in Madhepura Bihar : फायनान्स कंपनीचा कर्मचारी बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात होता. याचदरम्यान ही घटना घडली.

मधेपुरा : बिहारमधील मधेपुरा येथे चोरट्यांनी भरदिवसा एका फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला लुटल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी कर्मचाऱ्याकडून जवळपास 12 लाख रुपयांचा ऐवज लुटला आहे. बँक रोड येथील एसबीआयच्या 200 मीटर आधी ही घटना घडली. 

फायनान्स कंपनीचा कर्मचारी बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात होता. याचदरम्यान ही घटना घडली. या घटनेनंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे.यापूर्वी शहरातील एका प्रसिद्ध माजी मुख्याध्यापकाच्या घरावरील लाखोंच्या दरोड्याची उकलही पोलिसांना अद्याप करता आली नाही. तोपर्यंत आता पुन्हा एकदा दरोडेखोरांनी पोलिसांना आव्हान दिले आहे.  एसबीआय रोड हा शहरातील सर्वात वर्दळीचा परिसर आहे. 

या घटनेनंतर फायनान्स कंपनीचा कर्मचारी घाबरून रडू लागला. काही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हता. मात्र, बॅगेत 10 ते 12 लाख रुपये असल्याचे कर्मचाऱ्याने सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, बँकिंग सुविधा पुरविणाऱ्या रेडियन कंपनीचे कर्मचारी चंदन कुमार हे चोला फायनान्स, महिंद्रा फायनान्स आणि अॅमेझॉनकडून सुमारे 12 लाख रुपये घेऊन सकाळी साडेदहाच्या सुमारास बँकेत जमा करण्यासाठी जात होते. 

दरम्यान, एसबीआय रोड येथील राज हॉटेलसमोर होंडा शाईन दुचाकीवरील दोन चोरटे मागून आले आणि त्यांना पाठीमागून ढकलून दिले. यानंतर शस्त्राच्या जोरावर सर्व रक्कम हिसकावून ते फरार झाले. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी