शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

रहस्यमय! एकाच कुटुंबातील ११ जणांचे मृतदेह सापडले; हत्या की आत्महत्या? पोलिसांचा तपास सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 15:23 IST

या परिसरात ११ मृतदेह एकाच वेळी सापडल्याने खळबळ उडाल्याचं वातावरण आहे. याची सर्वत्र चर्चा होत आहे.

ठळक मुद्देकुंटुबातील ११ सदस्यांचा मृत्यू तर एकमेव सदस्य जिवंत हत्या, आत्महत्या की अपघात पोलीस करणार सर्वबाजूने तपास हे कुटुंब पाकिस्तानातून आलेले हिंदू शरणार्थी, राजस्थान येथे सीमावर्ती भागात राहत होते.

 जोधपूर  - राजस्थानच्या जोधपूरमध्ये ११ पाकिस्तानी शरणार्थींचा मृत्यू झाले आहेत. सध्या या मृत्यूचं कारण अस्पष्ट आहे. प्रथमदर्शनी विषारी गॅस अथवा रासायनिक विष प्यायल्याने मृत्यू झाल्याचं दिसून येत आहे. देचू ठाणे हद्दीतील लोडता परिसरातील ही घटना आहे. हे सर्व मृत व्यक्ती पाकिस्तानातून विस्थापित होऊन आले होते. अचलावता गावात हे सर्व शेतीची कामे करत होते, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

या परिसरात ११ मृतदेह एकाच वेळी सापडल्याने खळबळ उडाल्याचं वातावरण आहे. याची सर्वत्र चर्चा होत आहे. स्थानिक लोक त्यावर काहीही बोलण्यापासून दूर राहत आहेत. माहितीनुसार या घटनेत ६ प्रौढ आणि ५ मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यातील सात महिला आणि चार पुरुष असल्याचे पोलीस अधिकारी राजू राम यांनी सांगितले. पोलीस परिसरातील लोकांची चौकशी करत आहेत. पाकिस्तानमधील शरणार्थी मोठ्या प्रमाणात राजस्थानच्या सीमावर्ती गावात आश्रय घेत असतात. बहुतेक अनेक गावांची संपूर्ण लोकसंख्या पाकिस्तानी शरणार्थींची आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कुटुंबातील एक बहीण, जी व्यवसायाने नर्स आहे, आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी ती येथे आली होती. या बहिणीने पहिल्यांदा १० लोकांना विषारी इंजेक्शन दिले. त्यानंतर त्याने स्वत: ला इंजेक्शन देऊन संपवले असावे अशी शंका स्थानिकांनी व्यक्त केली आहे. पोलिसांच्या तपासणीदरम्यान या कुटुंबात एकूण ११ जण असल्याचे समजले आणि एक बहिण येथे आली होती. यानंतर, त्याठिकाणी एकूण १२ लोक उपस्थित होते, त्यापैकी ११ लोकांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबातील एक सदस्य शेताच्या दिशेकडे गेला होता, त्याठिकाणी रात्री त्याला झोप आली, त्यानंतर सकाळी उठून तो घराकडे आला, तेव्हा घरातील सर्वच मृत्यू झाल्याचं त्याने पाहिलं.

सध्या दुर्घटनास्थळी कोणालाही प्रवेश दिला जात नाही, ज्या खोलीत ही घटना घडली त्या ठिकाणी पोलिसांनी बंदी घातली आहे. आता पोलीस एफएसएलची टीम तिथे पोहोचण्याची वाट पाहत आहेत. एफएसएल टीम घटनास्थळावरील सर्व पुरावे गोळा करुन तपासाला योग्य दिशा देऊ शकतील असा पोलिसंना विश्वास आहे. पोलीस सर्वबाजूने या प्रकरणाचा तपास करत आहे, यात खून, आत्महत्या आणि अपघाताचा तपास करत आहेत, कुटुंबात जिवंत असलेला एकमेव सदस्याकडेही संशयाने पाहिलं जात आहे.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसHinduहिंदूRajasthanराजस्थानPakistanपाकिस्तान