शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

मुंब्य्रातून ११ लाखांच्या बनावट नोटा हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2020 04:01 IST

मुंब्रा रेल्वेस्थानक परिसरातील दत्त पेट्रोलपंपाजवळ काहीजण भारतीय चलनातील दोनशे, पाचशे आणि दोन हजार रुपये दराच्या हुबेहूब वाटणारा परंतु, बनावट नोटा वटविण्यासाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांना मिळाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : लॉकडाऊनमुळे झालेले कर्ज फेडण्यासाठी घरातच एका प्रिंटरवर बनावट भारतीय चलनी नोटा तयार करून त्यांची विक्री करणारे मुजमिल साल्हे सुर्वे (४०, रा. मुंब्रा), मुजफ्फर पावसकर (४१, अंधेरी, मुंबई), प्रवीण परमार (४३, साकीनाका, मुंबई) आणि नसरीन काझी (४१, रा. मुंब्रा) या चौघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. 

मुंब्रा रेल्वेस्थानक परिसरातील दत्त पेट्रोलपंपाजवळ काहीजण भारतीय चलनातील दोनशे, पाचशे आणि दोन हजार रुपये दराच्या हुबेहूब वाटणारा परंतु, बनावट नोटा वटविण्यासाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांना मिळाली होती. या आधारे कोथमिरे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, उपनिरीक्षक रमेश कदम, संजय भिवणकर आदींच्या पथकाने सापळा लावून मुजम्मील सुर्वे याच्यासह चौघांना १८ नोव्हेंबर रोजी ११ लाख ४९ हजारांच्या बनावट नोटांसह अटक केली. या चौकडीकडे मिळालेल्या एका बॅगेमध्ये ११ लाख ४९ हजारांच्या बनावट नोटा मिळाल्या आहेत. 

कर्जपरतफेडीसाठी ‘उद्योग’लॉकडाऊनच्या काळात कामधंदा नसल्यामुळे सुरुवातीला परमार आणि मुजफ्फर यांनी १० रुपयाची नोट एका प्रिंटरवर छापून ती वटविली. नंतर दोन हजारांच्या नोटेची त्यांनी अशीच पडताळणी केली. त्यांनी १२ लाख रुपयांच्या नोटा छापल्या. त्यातील ४५ हजार रुपये वटविल्याचे पोलिसांना सांगितले. त्यांच्याकडून २०० रुपयांच्या १५, ५०० च्या ९४८, तर दोन हजारांच्या ३३६ बनावट नोटा हस्तगत केल्या. चौघांनाही २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

टॅग्स :MONEYपैसा