शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

इंपोर्टेड गिफ्टच्या नावावर महिलेला ११ लाखांचा गंडा; आरोपीचे तार दिल्लीशी जुळलेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 18:18 IST

Crime News : महिलेच्या तक्रारीवरून राजुरा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंविच्या ४२० कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

ठळक मुद्देआरोपीने Whats App कॉल करून ही फसवणूक केली आहे. आरोपीचे तार थेट दिल्लीशी जुळलेले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

चंद्रपूर (राजुरा) : इंपोर्टेड गिफ्टच्या नावावर राजुरा येथील एका महिलेला तब्बल ११ लाखांनी गंडविल्याची खळबळजनक घटना पुढे आली आहे. आरोपीने Whats App कॉल करून ही फसवणूक केली आहे. आरोपीचे तार थेट दिल्लीशी जुळलेले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

महिलेच्या तक्रारीवरून राजुरा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंविच्या ४२० कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .यापूर्वी राजुरा शहरातील एका डॉक्टरला एक कोटीचे कर्ज काढून देतो म्हणून २० लाखांनी गंडविले होते. या दोन्ही प्रकरणाचे धागेदोरे दिल्लीपर्यंत पोहचले आहेत. राजुरा शहरातील एका महिलेला ऑनलाईन रिक्वेस्ट पाठवली. नंतर हळुहळू Whats Appवर नंबर घेतला. काही दिवसानंतर विदेशातून इंपोर्टेड गिफ्ट पाठवले आहे.  दिल्ली येथे लटकले आहे. यासाठी पैशाची कमतरता आहे. पैसे पाठवा. मोठी मौल्यवान वस्तू आहे. ती आता नागपूरला आली आहे, अशी बतावणी करून चक्क ११ लाख रुपयांचा गंडा घातला. याची तक्रार राजुरा पोलिसात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचे तपास अधिकारी एस. वी. दरेकर  म्हणाले, या प्रकरणाचे तार दिल्लीशी जुळले आहे. दिल्ली येथील अनेक एटीएममधून पैसे काढुन फसवणूक केली आहे. तो इतका गुन्ह्यात इतका तरबेज आहे की त्याने मोबाईलवरून कुठेही फोन केला नाही. फक्त Whats Appवरून कॉल करत होता. त्यामुळे आवश्यक डाटा उपलब्ध झाला नाही. राजुरा शहरात फसवणुकीचे जाळे पसरले आहेत. राजुरा पोलिस याबाबत कसून चौकशी करीत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसcyber crimeसायबर क्राइमArrestअटकdelhiदिल्ली