शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

शेगावातील धाडसी चोरीतील ११ आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

By निलेश जोशी | Updated: February 28, 2023 15:52 IST

दरम्यान संघटीत पद्धतीने चोरी, जबरी चारी, खून आणि खरफोडी करणारी ही टोळी असून बुलढाणा जिल्ह्यासह अैारंगाबाद, जालना, परभणी, बिड, नांदेड, नाशिक आणि नगर जिल्ह्यामध्ये या टोळीने गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत.

बुलढाणा : जिल्ह्यातील अलिकडील काळातील सर्वात मोठी धाडसी चोरी म्हणून गणल्या गेलेल्या शेगाव शहरातील आनंद पालडिवाल यांच्या घरी झालेल्या धाडसी घरफोडीतील ११ ही आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकले असून त्यांच्याकूडन पोलिसानी ४० लाख ३१ हजार ९८१ रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील धाडसी चोरीमधील ही एक चोरी नाशिकमधून मिळालेल्या एका छोट्या धाग्याच्या आधारावर पोलिसांनी उघडकीस आणली आहे. २८ फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड यांनी संदर्भाने शेगावात सविस्तर माहिती दिली.

दरम्यान संघटीत पद्धतीने चोरी, जबरी चारी, खून आणि खरफोडी करणारी ही टोळी असून बुलढाणा जिल्ह्यासह अैारंगाबाद, जालना, परभणी, बिड, नांदेड, नाशिक आणि नगर जिल्ह्यामध्ये या टोळीने गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत. आरोपींमध्ये वैभव मानवतकर (२६, रा. सोनाटी, मेहकर), मुंजा तुकाराम कहाले (२०), प्रितम अमृतराव देशमुख (२९, रा. पिंप्री देशमुख, परभणी), अजिंक्य दिंगबर जगताप (२७, रा. पुंगळा, जिंतुर), नवनाथ विठ्ठल सिंदे (१९, रा. गंगाखेड), कैलास लक्ष्मण सोनार (२४, जेलरोड, नाशिक), मयूर राजू ढगे (२२), सौरभ राजू ढगे (२६, दोघे. रा निफाड), सुजीत अशोक साबळे (२७, खडक मालेगाव, ता. निफाड), प्रविण दीपक गागुर्डे (रा. सातपुर, नाशिक) आणि पुजा प्रविण गागुर्डे (रा. सातपुते, नाशिक) यांना अटक करण्यात आली आहे. सध्या हे आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्याकडून नगदी १ लाख ५० हजार ७३० रुपये, ४६७ ग्रमॅचे ३७ लाख ४३ हजार ३५१ रुपयांचे हिरे जडीत सोन्याचे दागिने, १ लाख २ हजार १८२ रुपयांचे चांदीचे दागिने व अन्य मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील सर्वात मोठी धाडसी चोरीजिल्ह्याच्या गुन्हेगारीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी धाडसी चोरी होती. यात ९२ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी शेगाव येथील आनंद पालडिवाल यांच्या घरातून लंपास केला होता. यात नगरी २५ लाख रुपयांयस सोन्या-हिऱ्याचे ६५ लाखांचे दागिन्यांसह अन्य मुद्देमाल १६ जानेवारी २०२३ रोजी लंपास केला गेल्याचे उघडकीस आले होते. त्यावेळी पालडिवाल हे त्यांच्या आईच्या डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी जालना येथे गेले होते. परत आले असता हा प्रकार उघड झाला होता. शेगाव येथे पोलिस अधीक्षक सारंग आवाड यांनी या गुन्ह्या संदर्भात सविस्तर माहिती प्रसारमाध्यमांना २८ फेब्रुवारी रोजी दिली. 

 

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी