बेळगाव : बेळगाव पोलिसांनी मंगळवारी दोघांना अटक करुन त्यांच्याकडून दोन हजार रुपयांच्या एक कोटी ८१ हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या. असिफ शेख आणि रफीक देसाई अशी अटक केलेल्यांची नावे असून दोघेही बेळगाव जिल्ह्यातीलच रहिवासी आहेत.लॅपटॉप आणि कलर प्रिंटरचा वापर करून हे दोघे दोन हजाराच्या बनावट नोटा तयार करून बाजारात खपवत होते.रफीक देसाई हा सामाजिक कार्यकर्ता म्हणून वावरायचा. बेळगाव जिल्हा इस्पितळ आवारात गोरगरीब रुग्णांच्या नातेवाइकांना मोफत अन्नदान करून तो अन्नदाता म्हणून मिरवत होता. याआधीही भामटेगिरी आणि फसवणुकीचा आरोप करीत काही महिलांनी अर्धनग्न करून त्याची धिंड काढली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
बेळगावमध्ये एक कोटीच्या बनावट नोटा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 05:26 IST