युवकांनी स्वत:ची ओळख निर्माण करावी केडगावला युवक शिबिर
By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:18+5:302014-12-12T23:49:18+5:30
अहमदनगर: समाजात माणूस म्हणून जगणारी खूप कमी माणसे आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवकांनी आपली स्वत:ची ओळख निर्माण करावी, असे प्रतिपादन प्रा. डॉ. रमाकांत जाधव यांनी केले.

युवकांनी स्वत:ची ओळख निर्माण करावी केडगावला युवक शिबिर
अ मदनगर: समाजात माणूस म्हणून जगणारी खूप कमी माणसे आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवकांनी आपली स्वत:ची ओळख निर्माण करावी, असे प्रतिपादन प्रा. डॉ. रमाकांत जाधव यांनी केले.केडगाव येथील विद्या प्रतिष्ठानच्या बीएड विभागाने आयोजित केलेल्या युवक मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. ते म्हणाले, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, असा संदेश देणारे बाबासाहेब समजून घेतले पाहिजेत. त्यांचे साहित्य वाचले पाहिजे. महिलांचे संवर्धन, दुर्बल घटक यांच्यासाठी त्यांचे योगदान अभ्यासण्याची गरज आहे. सत्य स्वीकारणे शिकले पाहिजे. चांगले काम करता आले नाही तर वाईट काम तरी करू नये, असे जाधव म्हणाले. या कार्यक्रमास प्रा. डॉ. सुनील देसले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी सतीश लवांडे, जयंत मुळे, दीपक आढाव, प्रमोद राणा यांनी परिश्रम घेतले. तुषार म्हेत्रे यांनी सूत्रसंचालन केले.