वाटेफळला महिला मेळावा
By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:19+5:302014-12-12T23:49:19+5:30
अहमदनगर : रुईछत्तीसी येथील जनता कला, विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरांतर्गत वाटेफळ गावात ग्रामस्वच्छता व महिला मेळावा झाला. महिला सबलीकरणात युवतींची भूमिका या विषयावर प्रा. एस. एस. चौधरी यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, मुलगा संस्कार असेल, तर मुलगी संस्कृती आहे. मुलगा दिवा आहे, तर मुलगी दिव्याची ज्योत आहे. ज्या घरात महिलांचा छळ होते, त्या घरात दु:ख, दारिद्र्य आणि अधोगती पिढ्यानपिढ्या पहायला मिळते. राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. आर.ए. शितोळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. आर. ए. कदम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मराठी विभाग प्रमुख प्रा. ए. एम. भद्रे, प्रा. के.टी. निकड यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. यावेळी सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते.

वाटेफळला महिला मेळावा
अ मदनगर : रुईछत्तीसी येथील जनता कला, विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरांतर्गत वाटेफळ गावात ग्रामस्वच्छता व महिला मेळावा झाला. महिला सबलीकरणात युवतींची भूमिका या विषयावर प्रा. एस. एस. चौधरी यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, मुलगा संस्कार असेल, तर मुलगी संस्कृती आहे. मुलगा दिवा आहे, तर मुलगी दिव्याची ज्योत आहे. ज्या घरात महिलांचा छळ होते, त्या घरात दु:ख, दारिद्र्य आणि अधोगती पिढ्यानपिढ्या पहायला मिळते. राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. आर.ए. शितोळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. आर. ए. कदम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मराठी विभाग प्रमुख प्रा. ए. एम. भद्रे, प्रा. के.टी. निकड यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. यावेळी सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते.