(वाचली) विद्यापीठ म्हणजे काय? कागलच्या बालकल्याण संकुलातील मुलाची शिवाजी विद्यापीठास भेट शिवाजी विद्यापीठ पाहून भारावले विद्यार्थी...
By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:52+5:302014-12-20T22:27:52+5:30
कोल्हापूर : विद्यापीठ म्हणजे काय?, येथे कोणती शाळा भरते?, येथे मोठ्या मुलांची शाळा भरते; मग ती मुले शाळेचा ड्रेस का घालत नाहीत? इथे इतकी स्वच्छता कशी आहे? अशा अनेक प्रश्नांचा कल्लोळ आज, शनिवारी एका चुटकीशीरपणे सुटला. निमित्त होते, शिवाजी विद्यापीठातील विधी विभागाच्यावतीने कागल एज्युकेशन सोसायटीच्या बालसंकुलातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित शिवाजी विद्यापीठातील एकदिवसीय अभ्यासभेटीचे.

(वाचली) विद्यापीठ म्हणजे काय? कागलच्या बालकल्याण संकुलातील मुलाची शिवाजी विद्यापीठास भेट शिवाजी विद्यापीठ पाहून भारावले विद्यार्थी...
क ल्हापूर : विद्यापीठ म्हणजे काय?, येथे कोणती शाळा भरते?, येथे मोठ्या मुलांची शाळा भरते; मग ती मुले शाळेचा ड्रेस का घालत नाहीत? इथे इतकी स्वच्छता कशी आहे? अशा अनेक प्रश्नांचा कल्लोळ आज, शनिवारी एका चुटकीशीरपणे सुटला. निमित्त होते, शिवाजी विद्यापीठातील विधी विभागाच्यावतीने कागल एज्युकेशन सोसायटीच्या बालसंकुलातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित शिवाजी विद्यापीठातील एकदिवसीय अभ्यासभेटीचे. शिवाजी विद्यापीठातील सिनेट हॉल येथे आज सकाळी दहा वाजता विद्यापीठातील मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. जे. जमादार यांच्या हस्ते या अभ्यासभेटीचे उद्घाटन झाले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी विद्यापीठातील विधी अधिविभाग प्रमुख डॉ. रामकृष्ण नायक यांची प्रमुख उपस्थिती होती. आजपर्यंत शिवाजी विद्यापीठाबाबत फक्त ऐकले होते. मात्र, आज प्रत्यक्षात हे विद्यापीठ पाहण्यास मिळणार म्हटल्यावर या मुलांच्या मनात वेगळाच आनंद होता. शाळेतील विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठ दाखविण्याचा उपक्रम पहिल्यांदाच करण्यात आल्याने मुले खूप उत्साही झाली होती. विद्यापीठातील प्रवेशद्वारापासून आत येताच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा पाहून अनेक मुले भारावून गेली. येथे इतकी स्वच्छता कशी?, इथे कितवीची मुले शिकतात?, कोणता अभ्यास करतात? असे प्रश्न त्यांच्या डोक्यात होते. विधी विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सर्व विभागांची भेट घडवून आणून देत त्यांच्या मनातील कोडी अलगदपणे सोडवली.विधी विभागाच्यावतीने या बालकल्याण संकुलातील मुलांना येथील अभ्यासक्रमांची माहिती व्हावी, या उद्देशाने या अभ्यासभेटीचे नियोजन केले होते. तसेच या मुलांसाठी दुपारी जेवणाचा मस्तपैकी बेतही आखला होता. तसेच या विभागाच्यावतीने मुलांना नेण्या-आणण्यासाठी खास गाडीचीही सोय केली होती. अचानक मिळालेल्या या भेटीमुळे मुलांचा आनंद गगनात मावत नव्हता. विधी विभागाने त्यांना खाऊ व भेटवस्तूही देऊन त्यांचा सत्कारही केला. याप्रसंगी शिवाजी विद्यापीठातील विधी विभागाचे प्राध्यापक वाय. व्ही. दुगधाळे, के. एम. कुलकर्णी, अनुप नरवले यांच्यासह विद्यार्थी नरेंद्र खाबडे, सुप्रिया जाधव, अमृता कुलकर्णी, डॉ. हिमंतराव शिंदे, कागल बालकल्याण संकुलचे अधीक्षक बी. के. साळुंखे, श्रीमती एन. डी. साळोखे, आर. डी. पाटील, स्नेहल रावण यांच्यासह बालकल्याण संकुलातील आठवी ते बारावीत पर्यंतचे ९४ विद्यार्थी या अभ्यासभेटीत सहभागी झाले होते. ------अबब! विज्ञान विषयाची एवढी मोठी इमारत?आजपर्यंत विज्ञान विषयाचे साठपानी पुस्तक आम्ही पाहिले होते. मात्र, एका विज्ञान विषयाची एवढी मोठी इमारत आणि या इमारतीमध्ये फक्त एकच विज्ञान विषयाबद्दल शिकविले जाते, हे ऐकूण विद्यार्थ्यांना जरा धक्का बसला. मात्र, त्यांना याबाबत सविस्तर माहिती दिल्यानंतर त्यांना एवढ्या मोठ्या इमारतीचे कोडे सुटले. ------------विद्यापीठात विद्यार्थी, प्राध्यापक, कुलगुरू म्हणून या...विश्वविद्यालयात शिकण्याचे प्रत्येक मुलाचे स्वप्न असले पाहिजे. तुम्ही शिकला तरच देश महासत्ता होईल. तुमच्या शिक्षणाचा उपयोग तुमच्या घरच्यांना, तुमच्या समाजाला, तुमच्या देशाला झाला, तर तुमच्या शिक्षणाचे सार्थक होईल. आज तुम्ही शिवाजी विद्यापीठ पहिल्यांदा पाहण्यासाठी आला आहात. भविष्यात या शिवाजी विद्यापीठात मी शिक्षण घेईन, येथे प्राध्यापक होईन किंवा येथे कुलगुरू म्हणून येईन, हे स्वप्न घेऊन तुम्ही परत जा आणि त्या पद्धतीने वाटचाल करा, असे आवाहन मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. जे. जमादार यांनी उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांना केले. -------------------------फोटो ओळी : कागल एज्युकेशन सोसायटीच्या बालसंकुलातील विद्यार्थ्यांनी कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठास शनिवारी एकदिवसीय अभ्यासभेट दिली. यावेळी आयोजित उद्घाटन कार्यक्रमात मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. जे. जमादार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.२०१२२०१४-कोल-एसयुके -----------------------------शिवाजी विद्यापीठातील विधी विभागाच्यावतीने कागल एज्युकेशन सोसायटीच्या बालसंकुलातील विद्यार्थ्यांनी शनिवारी शिवाजी विद्यापीठास एकदिवसीय अभ्यासभेट दिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठाची माहिती देताना विद्यापीठाचे विधी अधिविभाग प्रमुख डॉ. रामकृष्ण नायक.२०१२२०१४-कोल-एसयुके०१ ----------------------------शिवाजी विद्यापीठातील विधी विभागाच्यावतीने कागल एज्युकेशन सोसायटीच्या बालसंकुलातील विद्यार्थ्यांनी शनिवारी शिवाजी विद्यापीठास एकदिवसीय अभ्यासभेट दिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांसोबत विद्यापीठाचे विधी अधिविभागातील प्राध्यापक, विद्यार्थी व कागल एज्युकेशन सोसायटीचे शिक्षक.२०१२२०१४-कोल-एसयुके०२