सिकलसेल आजार नियंत्रण सप्ताहांतर्गत शिक्षकांची कार्यशाळा
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
आकोट : स्थानिक ग्रामीण रुग्णालयामार्फत ११ डिसेंबरला नगर परिषद उर्दू शाळा क्र. १ मध्ये सिकलसेल आजारावर शिक्षकांची मार्गदर्शक कार्यशाळा घेण्यात आली.
सिकलसेल आजार नियंत्रण सप्ताहांतर्गत शिक्षकांची कार्यशाळा
आकोट : स्थानिक ग्रामीण रुग्णालयामार्फत ११ डिसेंबरला नगर परिषद उर्दू शाळा क्र. १ मध्ये सिकलसेल आजारावर शिक्षकांची मार्गदर्शक कार्यशाळा घेण्यात आली.यावेळी सिकलसेल आजारावर मार्गदर्शन रुपाली गोरे यांनी केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रा. इफ्तेखारअली तसेच प्रमुख पाहुणे प्रा. लाघे, प्रा. सुनील वर्हाळे तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून प्रशासकीय अधिकारी नंदकिशोर हिंगणकर यांची होती. कार्यक्रमाचे संचालन माधुरी येळणे, प्रास्ताविक सिकलसेल सहाय्यक जयश्री भटकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिचारिका कुळकर्णी, कोगदे तसेच मुख्तार, अफजल हुसेन, तस्लीम पटेल, नाझेमा मॅडम आदींनी परिश्रम घेतले. आभारप्रदर्शन अब्दुल अन्सार यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)...........