एपीआयच्या अहवालाची प्रतीक्षा
By Admin | Updated: February 8, 2016 22:56 IST2016-02-08T22:56:02+5:302016-02-08T22:56:02+5:30
जळगाव : न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मू. जे. महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. उदय कुळकर्णी यांनी त्यांचा एपीआयचा अहवाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे सादर केला असून विद्यापीठाने हा अहवाल तपासून दिलेला नाही.

एपीआयच्या अहवालाची प्रतीक्षा
ज गाव : न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मू. जे. महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. उदय कुळकर्णी यांनी त्यांचा एपीआयचा अहवाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे सादर केला असून विद्यापीठाने हा अहवाल तपासून दिलेला नाही. न्यायालयाने प्राचार्य डॉ. कुळकर्णी यांना आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे सूचित केले होते. त्यानुसार त्यांनी तो सादर केला होता. त्यानंतर मात्र, विद्यापीठाला त्यांचा अहवाल आठ दिवसाच्या आतच तपासण्याचे न्यायालयाने सूचित केले होते. मात्र, आठ दिवस पूर्ण झाल्यानंतरही हा अहवाल प्राप्त झालेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.