सदाबहार गीतांवर थिरकले चिमुकले

By Admin | Updated: March 6, 2015 23:07 IST2015-03-06T23:07:24+5:302015-03-06T23:07:24+5:30

अहमदनगर : हिंदी, मराठी चित्रपटांमधील विविध बहारदार गाण्यांवर भिस्तबाग येथील जिनियस ग्लोबल प्री-प्रायमरी स्कूलच्या चिमुकल्यांनी नृत्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकली़

Thirakle Chimukle on the evergreen lyrics | सदाबहार गीतांवर थिरकले चिमुकले

सदाबहार गीतांवर थिरकले चिमुकले

मदनगर : हिंदी, मराठी चित्रपटांमधील विविध बहारदार गाण्यांवर भिस्तबाग येथील जिनियस ग्लोबल प्री-प्रायमरी स्कूलच्या चिमुकल्यांनी नृत्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकली़
प्रारंभी जिनियस एज्युकेशनल ॲण्ड सोशल फौंडेशनचे अध्यक्ष प्रा़ बाळासाहेब शेंडगे यांच्या हस्ते बुधवारी नटराज पूजन करुन स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले़ याप्रसंगी उपाध्यक्ष प्रा़ शंकर सानप, सचिव संतोष कजबे, कोषाध्यक्ष प्रा़ पांडुरंग गवळी, संचालक मच्छिंद्र कजबे, बाबासाहेब कजबे आदी उपस्थित होते़ बार्बी गर्ल़़, तुने मारी एंट्री़़, होलियोमें उडे गुलाल़़, आता माझी सटकली़़, बोले चुडियाँ अशा विविध हिंदी, मराठी गीतांवर चिमुकल्या विद्यार्थ्यांनी नृत्य करुन उपस्थितांची मने जिंकली़ विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे शहराध्यक्ष डी़ आऱ शेंडगे यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले़ सूत्रसंचालन अनिता पांडे यांनी केले़ स्नेहसंमेलनासाठी लीला जॉय, नीलम परदेशी, सलमा शेख, मीना जाधव यांनी परिश्रम घेतले़
़़़़़़़़़
फोटो ओळी : वार्षिक स्नेहसंमेलनात हिंदी, मराठी गीतांवर नृत्य करताना जिनियस ग्लोबल स्कूलचे विद्यार्थी.

Web Title: Thirakle Chimukle on the evergreen lyrics