शेख इलियास, कळमनुरीमहात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम येथील पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ६७ गावांपैकी ६६ गावे तंटामुक्ती झाली आहेत. आतापर्यंत ४६ गावानाच बक्षिसाचा निधी मिळाला आहे. या निधीतून ४६ गावांचा विकास झाला आहे. महाराष्ट्रात २००७ पासून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. मागील वर्षातील १९ तंटामुक्त गावांना अद्याप निधी मिळालेला नाही. यावर्षी दोन पैकी एक गाव तंटामुक्त झाले असून, येथील पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वाकोडी हे गाव तंटामुक्त व्हायचे राहीले आहे. यावर्षी हेही गाव तंटामुक्त करून पोलीस ठाण्यांतर्गत येणारी सर्व गावे तंटामुक्त करण्याचा आपण प्रयत्न करीत असल्याचे कळमनुरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांनी सांगितले. बक्षिसाचा निधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व ग्रामसेवकांकडे सुपूर्द केला आहे. ग्रामसभेत ठरल्याप्रमाणे हा निधी खर्च होतो. आतापर्यंत ४६ गावांना ८१ लाखांचा निधी मिळाला आहे. या निधीतून गावाचा विकास साधला जात आहे. या निधीतून दिवाबत्ती, नाली बांधकाम, पाण्याचे संरक्षण तसेच ग्रामसभेत ठरल्याप्रमाणे या निधीचा विनियोग केला जातो. २० गावांचा बक्षिसांचा निधी मिळाल्यानंतर त्या गावांचा विकास होणार आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात गावांना बक्षिसाचा निधी दिला जातो. एक हजारापर्यंत लोकसंख्या असलेल्या गावांना एक लाख २ हजारांपर्यंतच्या गावाना २ लाख रुपये, तीन हजारापर्यंतच्या गावांना तीन ३ लाख रुपये, ५ हजारांपर्यंतच्या गावांना ५ लाख रुपये, ५ हजार ते १० हजारपर्यंतच्या गावांना ७ लाख तर १० हजार व त्याहून अधिक असलेल्या गावांना १० लाखांचा निधी दिला जातो. तंटामुक्तीचे विशेष पुरस्कार मिळालेले एकही गाव या पोलीस ठाण्यांतर्गत येत नाही.
‘तंटामुक्ती’ बक्षीस गाव विकासासाठी
By admin | Updated: September 13, 2014 00:09 IST