एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही
By Admin | Updated: August 7, 2015 00:06 IST2015-08-07T00:06:57+5:302015-08-07T00:06:57+5:30
दिलीप कांबळे: जात पडताळणी दाखले मिळण्याबाबत अडचणी दूर करणार

एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही
द लीप कांबळे: जात पडताळणी दाखले मिळण्याबाबत अडचणी दूर करणार सोलापूर: विशेष मागास प्रवर्गातील (एसबीसी) एकही विद्यार्थी फ्रीशिप किंवा शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, यासाठी शासन आवश्यक उपाययोजना करेल, असे सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले़ पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या विनंतीवरुन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या दालनात बैठक आयोजित केली होती़ यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव यु़सी़ लोणारे, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव टि़वा़ करपते, सोलापूर विशेष मागास प्रवर्ग संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक इंदापुरे, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे सरचिटणीस सुरेश फलमारी, पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग दिड्डी, उपाध्यक्ष ॲड़ श्रीनिवास क्यातम, सरचिटणीस दशरथ गोप, मुंबई प्रांत पद्मशाली संघमचे अध्यक्ष सैवी रामुलू यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते़राज्यमंत्री कांबळे म्हणाले की, एसबीसीतील विद्यार्थ्यांना जात पडताळणी दाखले मिळण्यास येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी संबंधित अधिकार्यांना सूचना देण्यात आल्या आहेत़ विद्यार्थ्यांचे फ्रीशिप तसेच शिष्यवृत्तीची प्रलंबित रक्कम देण्यासाठी पुरेशा निधीची तरतूद करण्यात आली आहे़ या प्रवर्गातील एकही विद्यार्थी फ्रीशिप किंवा शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, यासाठी शासन आवश्यक सर्व उपाययोजना करेल़ एसबीसीसाठी स्वतंत्र निधी द्यावा, अशी मागणी यावेळी राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केली़ नोकरदार मंडळींना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी उत्पन्नाची गणना करताना वेतनापासूनचे उत्पन्न वगळून ६ लाख मर्यादेत असून देखील जिल्हा प्रशासनाकडून चुकीचा आधार घेतला जात असल्याचे एसबीसी संघर्ष समितीच्या पदाधिकार्यांनी सांगितले. याबाबत जिल्हाधिकार्यांना सूचना देण्यात येतील, असे कांबळे म्हणाले़फोटो ओळी़़़ ०६ एचआर १६एसबीसीचे विविध मागण्यांबाबतचे निवेदन समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्याकडे देताना विशेष मागास प्रवर्ग संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक इंदापुरे, डावीकडून दशरथ गोप, सुरेश फलमारी, श्रीनिवास क्यातम, सैवी रामुलू, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, पांडुूरंग दिड्डी आदी.