ज्ञानेश्वर महाविद्यालयात कौशल्य विकास कार्यक्रम
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:27+5:302015-01-23T23:06:27+5:30
अहमदनगर : श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात जिल्हा क्रीडा कार्यालय, यश ग्रामीण विकास संस्था, मुळा एज्युकेशन सोसायटी व उद्यमशीलता युवा कार्यालय एवं खेल मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित कौशल्य विकास कार्यक्रम पार पडला.

ज्ञानेश्वर महाविद्यालयात कौशल्य विकास कार्यक्रम
अ मदनगर : श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात जिल्हा क्रीडा कार्यालय, यश ग्रामीण विकास संस्था, मुळा एज्युकेशन सोसायटी व उद्यमशीलता युवा कार्यालय एवं खेल मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित कौशल्य विकास कार्यक्रम पार पडला. प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा क्रीडाधिकारी भाऊसाहेब वीर हे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक शिंदे होते. उपप्राचार्य छबुराव पानमंद, यश ग्रामीण संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत बोबडे, प्रा. विश्वनाथ वाघमारे, दीपक आहुजा, रघुनाथ खांदेभराडे, देविदास साळुंके आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आपल्या बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक विकास करण्यासाठी मैदानी खेळ, व्यायाम हे महत्वाचे असून आपले शरीर हे आपला अनमोल दागिना असून ते तंदुरुस्त ठेवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन केले. यावेळी अमोल आगासे, प्रा. सोपान नवथर यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक क्रीडाविभाग प्रमुख प्रा. सुनील गर्जे यांनी केले. कार्यक्रमास राजेंद्र शिरसाठ, गोपीनाथ टेकाळे, सुभाष दरंदले, बाबासाहेब साळवे, बबलू शेख, बाबासाहेब कराळे, बाळासाहेब जपे, दत्तात्रय मुळे, रशिद सय्यद, संदीप भुजबळ, अशोक बर्डे, पद्माकर गायकवाड, गणेश पठाडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)...फोटो-२३ नेवासा कॉलेज नावाने आहे. ...ओळी- नेवासा येथील, श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना क्रीडा अधिकारी भाऊसाहेब वीर. समवेत उपप्राचार्य छबुराव पानमंद, श्रीकांत बोबडे आदी.