जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी सहा शाळांची निवड
By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:09+5:302014-12-20T22:27:09+5:30
माढा : जि़ प़ सोलापूर व पं़ स़ शिक्षण विभाग कुडरूवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातून जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी माढा तालुक्यातील सहा शाळांची निवड करण्यात आली़

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी सहा शाळांची निवड
म ढा : जि़ प़ सोलापूर व पं़ स़ शिक्षण विभाग कुडरूवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातून जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी माढा तालुक्यातील सहा शाळांची निवड करण्यात आली़पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांमध्ये जिव्हाळा सुसंस्कार विद्यालय, कुडरूवाडी, जि़ प़ शाळा अरण, जि़ प़ शाळा अंजनगाव या शाळांचा तर नववी आणि दहावीतून नवभारत विद्यालय, दारफळ, उमा विद्यालय, मोडनिंब, जि़ प़ प्रशाला माढा या सहा शाळांची जिल्हास्तरीय विज्ञान स्पर्धेसाठी निवड करण्यात आली़ परीक्षक म्हणून आऱ टी़ शिंदे, एस़ एऩ बशे?ी, एऩ आय़ काझी, एच़ आऱ गुरव यांनी काम पाहिल़े यशस्वी विद्यार्थ्यांना रवींद्र चव्हाण, मुख्याध्यापक धनाजी काटे, वसेकर, भांगे, राऊत यांचे मार्गदर्शन लाभल़े विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी सोमनाथ वैद्य, विस्तार अधिकारी विकास यादव यांनी अभिनंदन केल़े (वार्ताहर)फोटो ओळीजिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवताना विस्तार अधिकारी विकास यादव़ त्याप्रसंगी सुहास गुरव, धनाजी काटे आदी़