वर्ग सात अन् शिक्षक दोन शिक्षणाचा खेळखंडोबा धोंडाआखर जि. प. शाळेतील प्रकार
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
खंडाळ : तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा धोंडाआखर येथे एकूण विद्यार्थी संख्या १०० असून, येथे १ ते ७ पर्यंत वर्ग आहेत. मात्र, येथे विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याकरिता फक्त दोनच शिक्षक आहेत. ही शाळा आदिवासीबहुल भागात आहे. मागील वर्षी याच शाळेची विद्यार्थी संख्या १५० च्या आसपास होती; परंतु येथे शिक्षक नसल्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना इतरत्र शिक्षणास पाठविले. या प्रकारामुळे आदिवासी पालकांमध्ये शिक्षण विभागाविषयी प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. या ठिकाणी शिक्षक देण्यात यावे, अशी मागणी पालकवर्ग करीत आहे. (वार्ताहर)
वर्ग सात अन् शिक्षक दोन शिक्षणाचा खेळखंडोबा धोंडाआखर जि. प. शाळेतील प्रकार
खंडाळ : तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा धोंडाआखर येथे एकूण विद्यार्थी संख्या १०० असून, येथे १ ते ७ पर्यंत वर्ग आहेत. मात्र, येथे विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याकरिता फक्त दोनच शिक्षक आहेत. ही शाळा आदिवासीबहुल भागात आहे. मागील वर्षी याच शाळेची विद्यार्थी संख्या १५० च्या आसपास होती; परंतु येथे शिक्षक नसल्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना इतरत्र शिक्षणास पाठविले. या प्रकारामुळे आदिवासी पालकांमध्ये शिक्षण विभागाविषयी प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. या ठिकाणी शिक्षक देण्यात यावे, अशी मागणी पालकवर्ग करीत आहे. (वार्ताहर).........