निर्मिक फाउंडेशनतर्फे शालेय साहित्य वाटप
By Admin | Updated: June 23, 2016 00:07 IST2016-06-22T22:04:15+5:302016-06-23T00:07:28+5:30
इंदिरानगर : निर्मिक फाउंडेशनच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील दमणगंगेच्या काठावर कास हे ९० घरांचे गाव असून महाराष्ट्र-गुजरात या राज्यांच्या सीमारेषेवरील गाव अद्यापही दुर्लक्षित आहे. गावात अजूनही मूलभूत सुविधा नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या गावातील इयत्ता पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांना दप्तर, वा, चित्रकला साहित्य, वॉटरबॅग, पाटी, अंकलिपी, कंपासपेटी आदि साहित्यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटपही करण्यात आला. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष जयवंत बागूल, उपाध्यक्ष संदीप बच्छाव, सचिव नितीन पाटील, गणेश आमले, प्रसाद पवार, सचिन बागुल, शाळेतील उपशिक्षक विश्वनाथ पवार, तुकाराम पवार, पांडू पवार आदि उपस्थित होते.