शाळा महाविद्यालय.....

By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:26+5:302015-02-11T00:33:26+5:30

वानखडे शारीरिक शिक्षण महा., कामठी

School college ..... | शाळा महाविद्यालय.....

शाळा महाविद्यालय.....

नखडे शारीरिक शिक्षण महा., कामठी
कामठी : स्थानिक माधवराव वानखडे शारीरिक शिक्षण महाविद्यालयात क्रीडा महोत्सवाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. उद्घाटन माजी आ. यादवराव भोयर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्ष किशोरीताई भोयर, सचिव सुरेश भोयर, संचालक अनुराधा भोयर, अनुराग भोयर, प्राचार्य डॉ. श्यामकुमार चरडे, डॉ. मिलिंद उमेकर, उमेश पोकळे आदी उपस्थित होते. दोन दिवसीय महोत्सवात व्हॉलिबॉल, कबड्डी व विविध मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी कवायती सादर केल्या. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते विद्यापीठ व राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. श्यामकुमार चरडे यांनी केले. संचालन डॉ. कोहळे यांनी तर आभार डॉ. अनिल चरडे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)
......
गुरू महाराज विद्यालय, मसोरा
काटोल : मसोरा येथील गुरू महाराज विद्यालयात स्नेहसंमेलन व विज्ञान प्रदर्शनाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. उद्घाटन आ.डॉ. आशिष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जि.प. शिक्षण सभापती उकेश चव्हाण, नरखेड पं.स. सभापती राजू हरणे, डॉ. वामन राऊत, सुरेश अरसडे, सरपंच रवी गजभिये, सुरेखा अरसडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी आ.डॉ. आशिष देशमुख, शिक्षण सभापती उकेश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. बक्षीस वितरण कार्यक्रमात खंडविकास अधिकारी प्रशांत मोहोड यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र उमप यांनी केले. संचालन उत्तम कांबळे यांनी तर आभार बी.टी. टेकाडे यांनी मानले. विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी शेती विज्ञान, जल प्रदूषण, पूर नियंत्रण, पाणी व्यवस्थापन यावर आधारित प्रतिकृती मांडल्या होत्या. कार्यक्रमास सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: School college .....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.