शालेय बाल क्रीडा स्पर्धेचा समारोप

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:49+5:302015-02-14T23:51:49+5:30

मूर्तिजापूर:-माना येथे शुक्रवारी शालेय बाल क्रीडा स्पर्धेचा समारोप करण्यात आला.

The school children's sports competition concludes | शालेय बाल क्रीडा स्पर्धेचा समारोप

शालेय बाल क्रीडा स्पर्धेचा समारोप

र्तिजापूर:-माना येथे शुक्रवारी शालेय बाल क्रीडा स्पर्धेचा समारोप करण्यात आला.
क्रीडा स्पर्धा १२ व १३ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती शुभांगी खंडारे होत्या. बक्षीस वितरण कार्यक्रमाला एसडीओ निपाणे, ठाणेदार सुनील हुड, श्याम खंडारे, बाळू मोखडकर, शिक्षणविस्तार अधिकारी राम राऊत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. क्रीडा स्पर्धेत खो-खो, लंगडी, क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. कार्ली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने विजेतेपद पटकाविले. यावेळी विजेत्या संघाला शिल्ड देऊन गौरविण्यात आले. वैयक्तिक कामगिरी करणार्‍या खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The school children's sports competition concludes