साहेब, पगाराची व्यवस्था करा ना...! मनपा कर्मचार्यांचे नगर विकास राज्यमंत्र्यांना निवेदन
By Admin | Updated: December 14, 2014 00:45 IST2014-12-14T00:45:59+5:302014-12-14T00:45:59+5:30
अकोला: थकीत वेतनाच्या मुद्यावर संप पुकारलेल्या मनपातील कार्यरत तसेच कंत्राटी कर्मचार्यांनी शनिवारी सकाळी नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या निवासस्थानी धाव घेतली. वेतनाअभावी कुटुंबाची उपासमार होत असून, प्रशासन अजिबात गंभीर नसल्याचे सांगत कर्मचार्यांनी साहेब, तेवढी पगाराची व्यवस्था करा ना, अशी आर्त हाक डॉ.रणजित पाटील यांना दिली. यावर तोडगा काढणार असल्याचे आश्वासन राज्यमंत्री पाटील यांनी दिले.

साहेब, पगाराची व्यवस्था करा ना...! मनपा कर्मचार्यांचे नगर विकास राज्यमंत्र्यांना निवेदन
अ ोला: थकीत वेतनाच्या मुद्यावर संप पुकारलेल्या मनपातील कार्यरत तसेच कंत्राटी कर्मचार्यांनी शनिवारी सकाळी नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या निवासस्थानी धाव घेतली. वेतनाअभावी कुटुंबाची उपासमार होत असून, प्रशासन अजिबात गंभीर नसल्याचे सांगत कर्मचार्यांनी साहेब, तेवढी पगाराची व्यवस्था करा ना, अशी आर्त हाक डॉ.रणजित पाटील यांना दिली. यावर तोडगा काढणार असल्याचे आश्वासन राज्यमंत्री पाटील यांनी दिले.मनपातील कार्यरत तसेच सेवानिवृत्त कर्मचार्यांचे सहा महिन्यांचे वेतन थकीत आहे. यात भरीस भर पाचव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कमही प्रशासनाने अद्यापपर्यंत अदा न केल्याने सर्वाधिक त्रास सेवानिवृत्त कर्मचार्यांना सहन करावा लागत आहे. वेतनाच्या मुद्यावर प्रशासन कर्मचार्यांची दिशाभूल करीत असल्याने तोडगा निघत नसल्याचे मत मनपा कर्मचारी संघर्ष समितीने व्यक्त केले. परिणामी कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, असा प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासनाच्या धोरणामुळे आम्ही कमालीचे वैतागल्याचे कर्मचार्यांनी स्पष्ट केले. यामधून तुम्हीच साहेब काही तरी मार्ग काढा, अशी विनवणी कर्मचारी संघर्ष समितीच्यावतीने नगर विकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांना करण्यात आली. थकीत वेतनाच्या मुद्यावर शासनाकडे सतत अनुदानाची मागणी केली जाते. प्रशासनाने आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत राज्यमंत्री डॉ.पाटील यांनी व्यक्त केले. तरी सुद्धा यावर तोडगा काढण्याचे आश्वासन डॉ.पाटील यांनी मनपा कर्मचार्यांना दिले.बॉक्स...मुदतवाढ देण्यास टाळाटाळमानधन तत्त्वावर कार्यरत १६९ मनपा कर्मचार्यांना मुदतवाढ देण्यास प्रशासन मागील चार महिन्यांपासून टाळाटाळ करीत असल्याचे कंत्राटी कर्मचार्यांनी नगर विकास राज्यमंत्र्यांना सांगितले. याविषयी संबंधित अधिकार्यांना निर्देश देणार असल्याचे डॉ.पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.कोट...दहा महिन्यांमध्ये प्रशासनाने वसूल केलेला पैसा कोठे आहे, याचा ताळमेळ नाही. वेतनाच्या मुद्यावर प्रशासन जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करीत आहे. सेवानिवृत्त कर्मचार्यांची परिस्थिती फार बिकट आहे. यासर्व बाबी राज्यमंत्र्यांसमोर स्पष्ट केल्या. -पी.बी. भातकुले, अध्यक्ष मनपा कर्मचारी संघर्ष समिती