शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

भारती विद्यापीठाकडून आर.के .एम.चे एन. पी. पवार यांचा गौरव

By admin | Published: May 16, 2016 12:45 AM

कळवण : भारती विद्यापीठ पुणे यांच्या ५२व्या वर्धापनदिन समारंभप्रसंगी कळवणच्या आर. के. एम. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एन. पी. पवार यांचा शैक्षणिक कार्यातील सहकार्यांबद्दल भारती विद्यापीठाकडून सन्मानपूर्वक गौरव व सत्कार करण्यात आला.

कळवण : भारती विद्यापीठ पुणे यांच्या ५२व्या वर्धापनदिन समारंभप्रसंगी कळवणच्या आर. के. एम. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एन. पी. पवार यांचा शैक्षणिक कार्यातील सहकार्यांबद्दल भारती विद्यापीठाकडून सन्मानपूर्वक गौरव व सत्कार करण्यात आला.नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्‘ांतून आर. के. एम. माध्यमिक विद्यालय कळवणचे प्राचार्य एन. पी. पवार हे एकमेव प्राचार्य असून, भारती विद्यापीठाकडून दरवर्षी आयोजित करण्यात येणार्‍या विविध स्पर्धांचे व कार्यक्र मांचे आयोजन कळवणसारख्या आदिवासी तालुक्यातील आर. के. एम. माध्यमिक विद्यालयात करून भारती विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्यात भरीव योगदान दिल्याबद्दल हा सन्मान पूर्वक गौरव व सत्कार भारती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आनंदराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.भारती विद्यापीठाकडून दरवर्षी राज्यातील विविध माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात येतात, कळवणसारख्या आदिवासी तालुक्यातील आर. के. एम. माध्यमिक विद्यालयातील शेकडो विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेत सहभागी होत असून, आज अनेक आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थी भारती विद्यापीठात शिक्षण घेत आहे, भारती विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक प्रगती करून शिष्यवृत्ती मिळवली आहे. यात प्राचार्य एन. पी. पवार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावताना सहकार्य केल्याबद्दल भारती विद्यापीठाच्या ५२व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून हा सन्मानपूर्वक गौरव व सत्कार करण्यात आला.कळवण येथेही कळवण शिक्षण संस्थेच्या वतीने प्राचार्य एन. पी. पवार यांचा संस्थेचे अध्यक्ष ॲड. शशिकांत पवार, सरचिटणीस बेबीलाल संचेती, प्राचार्य डॉ. रावसाहेब शिंदे, संचालक विश्वनाथ व्यवहारे, बाबूराव पगार, राफोद्दिन शेख, आर. के. महाजन, सुमनताई देवरे डी. एम. पगार यांनी सत्कार केला.फोटो (१५कळवण)भारती विद्यापीठ पुणे ५२व्या वर्धापनदिनी आर. के. एम. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एन. पी. पवार यांचा सत्कार करताना भारती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आनंदराव पाटील. समवेत व्यासपीठावर सुधीर मुनगंटीवार, डॉ. पतंगराव कदम आदि.