प्रज्ञा - शाळांमध्ये वृक्षभेटीचा उपक्रम
By Admin | Updated: August 18, 2015 21:37 IST2015-08-18T21:37:08+5:302015-08-18T21:37:08+5:30
कापूरव्होळ : दिवसेंदिवस होत असलेला पर्यावरणाचा र्हास ही चिंतेची बाब बनली आहे. मनुष्य व पर्यावरण यांचा सहसंबंध असताना आपण याकडे दुर्लक्ष करीत आलो आहे. मात्र पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन वृक्षलागवड करून संवर्धन करून पर्यावरण वाचवणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पुणे जिल्हा काळी पिवळी जीप संघटनेचे अध्यक्ष सुनील कदम यांनी केले.

प्रज्ञा - शाळांमध्ये वृक्षभेटीचा उपक्रम
क पूरव्होळ : दिवसेंदिवस होत असलेला पर्यावरणाचा र्हास ही चिंतेची बाब बनली आहे. मनुष्य व पर्यावरण यांचा सहसंबंध असताना आपण याकडे दुर्लक्ष करीत आलो आहे. मात्र पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन वृक्षलागवड करून संवर्धन करून पर्यावरण वाचवणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पुणे जिल्हा काळी पिवळी जीप संघटनेचे अध्यक्ष सुनील कदम यांनी केले.स्वातंत्र्यदिनाच्यानिमित्ताने भोर तालुक्यातील विविध शाळांमध्ये वृक्षभेटीचा कार्यक्रम पुणे जिल्हा काळी पिवळी जीप संघटनेच्या वतीने आयोजिला होता. त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तेलवडी या ठिकाणी या संघटनेच्या वतीने ३० ते ३५ प्रकारच्या वेगवेगळ्या जातीच्या झाडांची रोपे मोफत भेट देण्यात आली. संघटनेचे उपाध्यक्ष सचिव यांनी विचार मांडले.या कार्यक्रमास तेलवडीचे सरपंच विजय धावले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष धावले पुणे जिल्हा काळी पिवळी जीप संघटनेचे उपाध्यक्ष गणेश साळेकर, सचिव दत्तात्रय गिर्हे, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर शेडगे, खजिनदार दिलीप चंदनशिव, सरचिटणीस दादा शेडगे व सदस्य हेमंत ताटे, भगवान घुटेकर, राजू मेहता, बाळू भोसले व तेलवडीचे ग्रामस्थ, विद्यार्थी हजर होते. सोबत फोटो : पुणे जिल्हा काळी पिवळी जीप संघटनेच्या वतीने शाळेस वृक्षांची रोपे भेट देताना.०००००