शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

फ्रेण्डशिप डे चं प्लॅनिंग करताय?- या घ्या काही प्लॅनिंगच्या आयडिया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 4:14 PM

येत्या रविवारच्या फ्रेण्डशिप डेचं सेलिब्रेशनचं काय प्लॅनिंग करताय?

ठळक मुद्देजे कराल ते घरी सांगून करा, चुकीचं धाडस करू नका.मस्त नटा, खा-प्या, जुन्या दोस्तानांही याद करा!

 

यंदाचा पहिला डे म्हणजे फ्रेण्डशिप डे, येत्या रविवारी येतोय. त्याची तयारी तुम्ही करत असाल तर काही गोष्टी हाताशी असलेल्या बर्‍या! फ्रेण्डशिप डे निमित्त छान नट्टापट्टा तर करायलाच हवा. मग या तरुणींचा ब्युटी पार्लरकडे मोर्चा वळेलच. मग वॅक्सिंगपासून क्लिनअप, फेशियल हे सारं सारं केल जाईल. ‘डे’ज चे हे फॅड पूर्वीपासून असले तरी ट्रेण्डी आणि फॅशनेबल दिसण्यासाठी बर्‍याच जणींनी ब्युटी सलूनमध्ये धाव घेणे साहजिकच आहे. मग केसांना कलर करणे, हेअर स्ट्रेटनिंग करणे, हातांना मेहंदी किंवा दंडावर टॅटू करणे, नेल आर्ट, मॅन्यूकेअर, पॅडिक्यूअर हेही करतात अनेकजणी. करायला अर्थातच हरकत नाही. बजेटची तेवढी काळजी घ्या.

पण वेगळी काही फॅशन करायची असेल तर पायांतील पैंजण, नाकातील ट्रेण्डी नथनी, गळ्यात कपडय़ांवर साजतील अशा माळा, हे सारं जमवून ठेवा. रेट्रो लूक सध्या हीट आहे.तेव्हा बर्‍याच जणींनी हेअरबॅण्ड, रब्बरबॅण्ड जमवून ठेवा.

इतका नट्टापट्टा करून तयार होऊन कॉलेजमध्ये जायचे, मित्र-मैत्रिणींमध्ये भाव खायचा आणि फोटोतर काढायलाच हवा ना. ‘सेल्फि’च्या आधीच्या काळातील तरुण-तरुणी आपापल्या ग्रुपसोबत एखाद्या जवळच्याच स्टुडियोमध्ये जाऊन फोटो काढून घ्यायचे. ही आठवण सर्वाकडेच राहावी आणि वयात आलेल्या तरुणींना लग्नासाठी काही फोटो असावेत म्हणून पोट्रेट फोटोही काढले जायचे. मात्र आत्ताच्या या ‘सेल्फी’ जमान्यात प्रत्येकाकडेच अ‍ॅण्ड्रॉइड मोबाईल असल्यामुळे काढ फोटो टाक फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर अशी पद्धत रुढ होत चालली आहे. त्यामुळे आपल्या छान छान फोटोंना भरपूर लाईक्स मिळावे आणि मस्त डिपी ठेवता यावा यासाठीही  तयारी केलेली बरी!

बर आता कॉलेजच्या संपूर्ण वेळात ‘डे’ साजरा तर केला. मग इतके सजून धजून काय लगेच घरी जायचे का?

मस्त सिनेमाला जा, पिकनिकला जा. हॉटेलात जेवायला जा. एखाद्या मित्रमैत्रिणीच्या घरी गेट टुगेदर करा.

पण हे सारं करताना घरच्यांची परवानगी घ्या. त्यांना सांगा. आणि कुठलीही आगाऊ रिस्क न घेता आनंदानं आपला दिवस साजरा करा.

प्लॅनिंग करायचं ते याचसाठी की, आपला दिवस आनंदी आणि उत्साही असेल आणि यादगारही होईल!