राष्ट्रीय विद्यार्थी संसद भाग २
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:23+5:302015-01-23T23:06:23+5:30

राष्ट्रीय विद्यार्थी संसद भाग २
>चौकटनिवडणुका सुरू करण्याची मागणीउद्घाटन सत्रादरम्यान विद्यार्थी निवडणुका परत सुरू करण्यात याव्यात ही मागणी मान्यवरांकडून उपस्थित करण्यात आली. मनीष अवस्थी यांनी हा मुद्दा उपस्थित केला. यावर प्रभारी कुलगुरू डॉ.देशपांडे यांनी यासंदर्भात सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. निवडणुकांच्या माध्यमातून महाविद्यालयांत चुकीच्या गोष्टींचा शिरकाव होत होता, त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांना बंद करण्यात आले. परंतु आता यासंदर्भात सकारात्मक विचार करत आहे अशी चर्चा आहे असे निकम म्हणाले.चौकटशिक्षेची अंमलबजावणी तातडीने व्हावीअनेक वर्षे खटला चालल्यानंतर गुन्हेगारांना फाशी देण्यात येते, परंतु प्रत्यक्षात शिक्षेची अंमलबजावणी होण्यास वेळ लागतो यासंदर्भात ॲड.उज्ज्वल निकम यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी यावर आपले परखड मत व्यक्त केले. शिक्षेची अंमलबजावणी लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. यासंदर्भात पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.