मनपा शाळा बातमी भाग २
By Admin | Updated: February 6, 2015 01:17 IST2015-02-06T01:17:32+5:302015-02-06T01:17:32+5:30
यशाचे प्रमाण ९५ टक्के

मनपा शाळा बातमी भाग २
य ाचे प्रमाण ९५ टक्केसर्वेक्षणात नमूद करण्यात आलेल्या १२ समस्यांपैकी प्रथम ६ समस्यांवर भर देण्यात आला. तीन समस्यांनुसार २० ते २१ जानेवारी रोजी गांधीनगर मार्गावरील झाडांची छाटणी करण्यात आली. त्यामुळे या मार्गावर प्रकाश येऊ लागला. शाळेची तुटलेली भिंत व प्रवेशद्वार बनविण्याचे काम सुरू झाले आहे. अशातऱ्हेने या सर्वेक्षणाच्या यशाची टक्केवारी ९५ टक्के राहिली. उर्वरित तीन समस्या काही दिवसांत दूर होणार, हे निश्चित आहे.मनपाचे पूर्ण सहकार्य मिळालेसर्वेक्षणादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. त्यांच्या प्रयत्नांतून हे यश मिळाले. नागपूर महानगरपालिकेने मोलाची मदत केली. महापौर प्रवीण दटके व नगरसेविका अश्विनी जिचकार यांनी मौलिक मार्गदर्शन केले-सुधा वेलेकर, मुख्याध्यापिकाआमच्यासाठी अविस्मरणीय अनुभवही स्पर्धा आमच्यासाठी एक संधी घेऊन आली. या माध्यमातून विद्यार्थ्यांसोबत मला बरेच काही शिकायला मिळाले. सुरुवातीला विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास थोडा कमी होता. परंतु नागपुरात मिळालेल्या यशामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत केली व यश मिळवले. हा नक्कीच एक अविस्मरणीय अनुभव होता.- कमला मंगनानी, वर्गशिक्षिकासहभागी विद्यार्थी या टीममध्ये दोन विद्यार्थी व सात विद्यार्थिनींचा समावेश होता. यात दिव्यांशी द्विवेदी, प्रतिका मिश्रा, आंचल शर्मा, रिया विश्वकर्मा, मौसमी ठाकूर, रेखा तिवारी, प्रिया चव्हाण, अंशुमन प्रजापती व जयशंकर त्रिपाठी यांचा समावेश होता.