ंआरटीईची प्रवेश प्रक्रिया शेवटच्या आठवड्यात
By Admin | Updated: February 4, 2015 23:41 IST2015-02-04T23:41:19+5:302015-02-04T23:41:19+5:30
पुणे: प्राथमिक शिक्षण विभागातर्फे पुणे महानगरपालिका परिसरातील शाळांमधील शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) येणा-या आरक्षित 25 टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया येत्या 23 फेब्रुवारीपासून ऑनलाईन पध्दतीने सुरू केली जाणार असून विद्यार्थ्यांच्या पालकांना मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

ंआरटीईची प्रवेश प्रक्रिया शेवटच्या आठवड्यात
प णे: प्राथमिक शिक्षण विभागातर्फे पुणे महानगरपालिका परिसरातील शाळांमधील शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) येणा-या आरक्षित 25 टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया येत्या 23 फेब्रुवारीपासून ऑनलाईन पध्दतीने सुरू केली जाणार असून विद्यार्थ्यांच्या पालकांना मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.शिक्षण विभागातर्फे चालू शैक्षणिक वर्षात राज्यातील मोठ्या शहरांमध्ये शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आरक्षित जागांची प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यात पुणे शहरातील शाळांमधील प्रवेश प्रक्रिया 23 फेब्रुवारीपासून राबविण्याबाबतचे वेळापत्रक शिक्षण विभागाने तयार केले आहे. मागील वर्षी प्रवेशासाठी आवश्यक असलेली कागदपत्रेच पालकांना जमा करावी लागणार आहेत. प्रवेश प्रक्रिया सुमारे 15 दिवसांनी सुरु होणार असल्यामुळे प्रवेशासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे जमा करण्यासाठी पालकांना आता धावपळ करावी लागणार आहे.एससी व एसटी संवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी जात प्रमाणपत्र व रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याच प्रमाणे अपंग विद्यार्थ्यांनी अपंग प्रमाणपत्र सादर करणे बंधनकार आहे.तर खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयातून एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचा दाखला, रहिवासी दाखला,आधार कार्ड आदी कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. प्रवेश प्रक्रियेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वी पालकांनी कागदपत्रे जमा करावीत,असे आवाहन प्राथमिक शिक्षण अधिका-यांनी केले आहे.----------