कुलगुरूपदासाठी अंतिम ५ नावे निि›त उमवि: निवड समितीने आज राज्यपालांकडे मागितलीय वेळ
कुलगुरूपदासाठी अंतिम ५ नावे निि›त उमवि: निवड समितीने आज राज्यपालांकडे मागितलीय वेळ
जळगाव: उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी मुंबई येथे कुलगुरू शोध समितीतर्फे सोमवारी दुसर्‍या दिवशी १७ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. सर्व ३३ उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण झाल्याने त्यातून ५ नावे अंतिम करण्यात येऊन राज्यपालांकडे ही नावे सादर करण्यासाठी समितीने वेळ मागितली आहे. मात्र त्यास अद्याप राजभवनकडून प्रतिसाद मिळालेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आज यांच्या झाल्या मुलाखती
सोमवारी एकूण ३३ पैकी उर्वरीत १७ उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. त्यात उमवितील ११ इच्छुकांपैकी ५ जणांचा समावेश होता. ६ जणांच्या मुलाखती रविवारीच पार पडल्या आहेत. सोमवारी मुलाखती झालेल्या उमवितील इच्छुकांमध्ये कुलसचिव प्रा.ए.एम. महाजन, स्कूल ऑफ एन्व्हायरमेंटल सायन्स ॲण्ड अर्थ सायन्सचे संचालक व एन्व्हायरमेंटल सायन्स विभागाचे प्रमुख प्रा.एस.टी.इंगळे, फिजीकल केमिस्ट्री विभागाचे प्रमुख प्रा.अमूलराव बोरसे, युनिव्हर्सिटी इन्स्टट्यिूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे संचालक आर.डी. कुलकर्णी, तसेच प्लास्टिक टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख प्रा.सत्येंद्र मिश्रा यांचा समावेश होता.
अंतिम ५ उमेदवारांच्या राज्यपाल घेणार मुलाखती
एकूण ३३ इच्छुकांच्या मुलाखतीनंतर पाच जणांची अंतिम मुलाखतीसाठी निवड करण्यात आली असून राज्यपाल तथा कुलपती या पाच जणांच्या मुलाखती घेतील. त्यासाठी ही नावे सोपविण्याकरीता कुलगुरू शोध समितीतर्फे मंगळवारी राज्यपालांच्या भेटीची वेळ मागण्यात आली आहे. मात्र त्याबाबत रात्रीपर्यंत राजभवन कडून होकार मिळालेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Web Title: The last 5 names for the conspiracy to be decided: The time has been asked by the Selection Committee today.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.