कोराडी... आयटीआय
By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:35+5:302015-02-11T00:33:35+5:30
परशुराम औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, कोराडी

कोराडी... आयटीआय
प शुराम औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, कोराडीकोराडी : येथील परशुराम औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात मिटकॉन संस्थेतर्फे औद्योगिक कार्यक्रम नुकताच पार पडला. जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने आयटीआयमधील प्रशिक्षणार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र व दोन हजार रुपयांचा धनादेश वितरित करण्यात आला. समारोपीय कार्यक्रमास मिटकॉनचे जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर चौधरी, विभागीय अधिकारी राजेश मिश्रा, प्रसन्न निखारे, आयटीआयचे संचालक सुरेश याऊल, मयूर याऊल तसेच शिक्षक ओंकार मलवे, दुर्गेश बावनकुळे, आशिष रामटेके, मनोज पाठे, महेश नगरकर, सिद्धार्थ सहारे, वसिम खान, अंकीत हलमारे, तृप्ती हक्केवार आदी उपस्थित होते. संचालन प्रेरणा जलांदर यांनी तर आभार राहुल सोनोने यांनी मानले. (वार्ताहर)