विस्तार अधिकारी संघटनेच्या जिल्हाध्यपदी कराड (फोटो आहे)
By Admin | Updated: August 20, 2015 22:10 IST2015-08-20T22:10:06+5:302015-08-20T22:10:06+5:30
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्गंत कार्यरत असणारे शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी कराड यांची विस्तार अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. राज्याचे अध्यक्ष विस्तार अधिकारी रमजान पठाण यांनी कराड यांच्या नावाची घोषणा केली आहे. यासह सरचिटणीसपदी ज्ञानेश्वर कलगुंडे यांची निवड करण्यात आली आहे.

विस्तार अधिकारी संघटनेच्या जिल्हाध्यपदी कराड (फोटो आहे)
अ मदनगर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्गंत कार्यरत असणारे शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी कराड यांची विस्तार अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. राज्याचे अध्यक्ष विस्तार अधिकारी रमजान पठाण यांनी कराड यांच्या नावाची घोषणा केली आहे. यासह सरचिटणीसपदी ज्ञानेश्वर कलगुंडे यांची निवड करण्यात आली आहे. मंगळवारी पठाण यांच्या अध्यक्षतेखाली विस्तार अधिकारी संघटनेची बैठक झाली. यावेळी राज्य प्रतिनिधी चंद्रकांत सोनार, ज्ञानेश्वर वाकचौरे, धोंडीराम राऊत उपस्थित होते. १५ दिवसांपूर्वी पठाण यांची विस्तार अधिकारी संघटनेच्या राज्याच्या अध्यक्षपदी निवड झालेली होती. त्यांच्या निवडीमुळे जिल्हाध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती. त्या ठिकाणी कराड यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. कराड यांच्या निवडीनंतर जिल्हा कार्यकारणीतही फेरबदल करण्यात आले आहे. नूतन कार्यकारणीत कार्याध्यक्षपदी रवींद्र कापरे, उपाध्यक्षपदी राजेंद्र पवार, उज्ज्वला गायकवाड, कोषाध्यक्षपदी निर्मला साठे, कार्यालय चिटणीसपदी अभय वाव्हळ, सहचिटणीसपदी विनेश लाळगे, महिला प्रतिनिधीपदी जयश्री कार्ले, सविता कचरे यांची निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर विस्तार अधिकार्यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन नूतन जिल्हाध्यक्ष कराड यांनी दिले आहे. ............