कणक गोविंंद आश्रमशाळेला कुलूप धामणगाव : फर्निचर, स्वयंपाकाचे सामान पडून
By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:17+5:302014-12-12T23:49:17+5:30
अकोले : तालुक्यातील धामणगाव पाट येथे सुरु झालेली राजमाता जिजाऊ शिक्षण मंडळाची (तळोदा, जि. नंदूरबार) कणक गोविंद अनुसूचित जाती-जमाती निवासी आश्रमशाळा वादाच्या भोवर्यात अडकल्याने पाचच महिन्यांत बंद पडली. या भाड्याच्या इमारतीत आता फक्त फर्निचर व स्वयंपाकाचे सामान पडून आहे.

कणक गोविंंद आश्रमशाळेला कुलूप धामणगाव : फर्निचर, स्वयंपाकाचे सामान पडून
अ ोले : तालुक्यातील धामणगाव पाट येथे सुरु झालेली राजमाता जिजाऊ शिक्षण मंडळाची (तळोदा, जि. नंदूरबार) कणक गोविंद अनुसूचित जाती-जमाती निवासी आश्रमशाळा वादाच्या भोवर्यात अडकल्याने पाचच महिन्यांत बंद पडली. या भाड्याच्या इमारतीत आता फक्त फर्निचर व स्वयंपाकाचे सामान पडून आहे. आदिवासी ६७ विद्यार्थ्यांसह ही शाळा तळोदा येथून स्थलांतरित होत धामणगावला सुरू झाली होती. परंतु पाचच महिन्यांत शाळेला कुलूप लागल्याने संस्थेने या मुलांना आपापल्या घरी सोडले. ३० जून २०१४ ला या अनुदानित आश्रमशाळेच्या नोकरभरती दरम्यान गोंधळ झाला होता. संस्थाचालकास चोप देऊन त्याची स्कोडा गाडी फोडून गावातून पिटाळून लावले होते. राजूर येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी डॉ. तुकाराम पिचड यांनी आदिवासी विभागाची कोणतीच शाळा धामणगाव पाट येथे नाही, असा निर्वाळा दिला होता. मोठ्या हलाखीत सुरु असलेली ही शाळा दिवाळीनंतर भरलीच नाही. मुलांना शिकवण्यासाठी शिक्षक नव्हते. तसेच मुलांचीही फरपट सुरू होती. त्यामुळे शाळेला कुलूप लागले. गावातील एका इमारतीला मोठ्या दिमाखात झळकत असलेले संस्थेचे फलकही आता गायब झाले आहे. इमारतीत फक्त फर्निचर व स्वयंपाकाची भांडी पडून आहेत. इमारत ओस पडली असून गावकरी शाळा सुरु होण्याची वाट पाहत आहेत. -------------या शाळेत गरीब पोरं होती. त्यांचं या शाळेने नुकसान केले. शाळा व्हती तवा गावात कलकलाट राहायचा. आता दुपारी सुनं गाव खायला उठतं.- चौधरी बाबा, गावातील वृद्ध--------पोरांचे लई हाल होते, शिक्षक कोण? हे कधी कळालंच नाही. तीन महिन्यांत वर्गच कधी भरलेला आणि शिक्षक शिकवताना दिसला नाही. दिवाळीला गेलेली मुले परत आलीच नाही. शाळा बंद होतानाच्या शेवटच्या दिवसांत मुलांना खायला नव्हतं. मी तांदळाचा कट्टा देवून मुलांना स्वयंपाक करुन वाढला- गावातील किराणा दुकानदार सोबत फोटो