चौगुले महाविद्यालयात विद्यार्थ्यांना निरोप समारंंभ
चौगुले महाविद्यालयात विद्यार्थ्यांना निरोप समारंंभ
कोतोली : येथील चौगुले महाविद्यालयात बी.ए.भाग तीनच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रम झाला. यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जे. के. पवार होते. विद्यार्थी हा जन्मापासून मुत्यूपर्यंत विद्यार्थीच असतो. शिक्षण कधीही संपत नाही, असे अध्यक्षीय भाषणात प्राचार्य जे. के. पवार म्हणाले.
प्रियांका दिघे, प्रियांका कुंभार, विद्या पाटील, पल्लवी सुतार, किरण कंुभार, प्रवीण पाटील, शीतल पाटील, मनीषा बोळावे, सुविद्या कांबळे, आदींनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास सचिव शिवाजीराव पाटील, विलास खापणे, बबन चौगुले, आदी उपस्थित होते. व्ही. पी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यु. एन. लाड यांनी आभार मानले. (वार्ताहर)
Web Title: Inauguration of students at Chougule College
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.