(सुधारित : वाचली) विद्यापीठात कोणती शाळा भरते सर...? शाळकरी मुलांचा निरागस प्रश्र्न : शिवाजी विद्यापीठास अभ्यासभेट

By Admin | Updated: December 20, 2014 22:28 IST2014-12-20T22:28:09+5:302014-12-20T22:28:09+5:30

कोल्हापूर : विद्यापीठ म्हणजे काय, येथे कोणती शाळा भरते, येथे मोठ्या मुलांची शाळा भरते; मग ती मुले शाळेचा ड्रेस का घालत नाहीत, इथे इतकी स्वच्छता कशी आहे, असे अनेक प्रश्र्न आज शाळकरी मुलांनी विद्यापीठास विचारले. निमित्त होते, कागल एज्युकेशन सोसायटीच्या बालसंकुलातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित विद्यापीठातील एकदिवसीय अभ्यासभेटीचे. शिवाजी विद्यापीठाच्या विधी विभागाच्यावतीने त्याचे आयोजन करण्यात आले.

(Improved: read) Which school fills in the university ...? School children's kind of questions: Study at Shivaji University | (सुधारित : वाचली) विद्यापीठात कोणती शाळा भरते सर...? शाळकरी मुलांचा निरागस प्रश्र्न : शिवाजी विद्यापीठास अभ्यासभेट

(सुधारित : वाचली) विद्यापीठात कोणती शाळा भरते सर...? शाळकरी मुलांचा निरागस प्रश्र्न : शिवाजी विद्यापीठास अभ्यासभेट

ल्हापूर : विद्यापीठ म्हणजे काय, येथे कोणती शाळा भरते, येथे मोठ्या मुलांची शाळा भरते; मग ती मुले शाळेचा ड्रेस का घालत नाहीत, इथे इतकी स्वच्छता कशी आहे, असे अनेक प्रश्र्न आज शाळकरी मुलांनी विद्यापीठास विचारले. निमित्त होते, कागल एज्युकेशन सोसायटीच्या बालसंकुलातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित विद्यापीठातील एकदिवसीय अभ्यासभेटीचे. शिवाजी विद्यापीठाच्या विधी विभागाच्यावतीने त्याचे आयोजन करण्यात आले.
विद्यापीठातील सिनेट हॉल येथे आज सकाळी दहा वाजता मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. जे. जमादार यांच्या हस्ते या अभ्यासभेटीचे उद्घाटन झाले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विधी अधिविभाग प्रमुख डॉ. रामकृष्ण नायक प्रमुख उपस्थित होते.
विद्यापीठाचा परिसर पाहताना मुलांच्या मनात वेगळाच आनंद होता. शाळेतील विद्यार्थ्यांना विद्यापीठ दाखविण्याचा उपक्रम पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला. विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा पाहून अनेक मुले भारावून गेली. विधी विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सर्व विभागांची भेट घडवून आणून देत मुलांच्या मनातील कोडी अलगदपणे सोडवली. या मुलांसाठी दुपारी जेवणाचा मस्तपैकी बेतही आखला होता. मुलांना नेण्या-आणण्यासाठी खास गाडीचीही सोय केली होती. खाऊ व भेटवस्तू देऊन विधी विभागातर्फे त्यांचा सत्कारही केला.
यावेळी विधी विभागाचे प्राध्यापक वाय. व्ही. दुगधाळे, के. एम. कुलकर्णी, अनुप नरवले यांच्यासह विद्यार्थी नरेंद्र खाबडे, सुप्रिया जाधव, अमृता कुलकर्णी, डॉ. हिमंतराव शिंदे, कागल बालकल्याण संकुलचे अधीक्षक बी. के. साळुंखे, श्रीमती एन. डी. साळोखे, आर. डी. पाटील, स्नेहल रावण यांच्यासह बालकल्याण संकुलातील आठवी ते बारावीपर्यंतचे ९४ विद्यार्थी या अभ्यासभेटीत सहभागी झाले.
------
आता कुलगुरू म्हणून या...!
विश्वविद्यालयात शिकण्याचे प्रत्येक मुलाचे स्वप्न असले पाहिजे. तुम्ही शिकला तरच देश महासत्ता होईल. तुमच्या शिक्षणाचा उपयोग घरच्यांना, समाजाला, देशाला झाला, तर तुमच्या शिक्षणाचे सार्थक होईल. आज तुम्ही शिवाजी विद्यापीठ पहिल्यांदा पाहण्यासाठी आला आहात. भविष्यात या शिवाजी विद्यापीठात मी शिक्षण घेईन, येथे प्राध्यापक होईन किंवा येथे कुलगुरू म्हणून येईन, हे स्वप्न घेऊन तुम्ही परत जा आणि त्या पद्धतीने वाटचाल करा, असे आवाहन मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. जे. जमादार यांनी उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांना केले.
-------------------------
फोटो ओळी : कागल एज्युकेशन सोसायटीच्या बालसंकुलातील विद्यार्थ्यांनी कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठास शनिवारी अभ्यासभेट दिली. यावेळी आयोजित उद्घाटन कार्यक्रमात मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. जे. जमादार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. (आदित्य वेल्हाळ)
२०१२२०१४-कोल-एसयुके
-----------------------------
शिवाजी विद्यापीठातील विधी विभागाच्यावतीने कागल एज्युकेशन सोसायटीच्या बालसंकुलातील विद्यार्थ्यांनी शनिवारी शिवाजी विद्यापीठास एकदिवसीय अभ्यासभेट दिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठाची माहिती देताना विद्यापीठाचे विधी अधिविभाग प्रमुख डॉ. रामकृष्ण नायक. (आदित्य वेल्हाळ)
२०१२२०१४-कोल-एसयुके०१
----------------------------
शिवाजी विद्यापीठातील विधी विभागाच्यावतीने कागल एज्युकेशन सोसायटीच्या बालसंकुलातील विद्यार्थ्यांनी शनिवारी शिवाजी विद्यापीठास एकदिवसीय अभ्यासभेट दिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांसोबत विद्यापीठाचे विधी अधिविभागातील प्राध्यापक, विद्यार्थी व कागल एज्युकेशन सोसायटीचे शिक्षक. (आदित्य वेल्हाळ)
२०१२२०१४-कोल-एसयुके०२

Web Title: (Improved: read) Which school fills in the university ...? School children's kind of questions: Study at Shivaji University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.